भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. यामुळे देशातील शेतकरी बांधवांच्या (Farmers) कल्याणासाठी केंद्र सरकार (Central Government) तसेच वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकार (State Governement) वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना (Farmers Scheme) कार्यान्वित करत असते.
शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ (Farmers Income) करण्यासाठी फळबाग लागवडीला प्रोत्साहन म्हणून गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District Farmers) देखील आता प्रशासनाने कंबर कसली आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 540 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली होती.
यामध्ये अजून वाढ केली जावी असे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. यावर्षी 740 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड व्हावी म्हणून गडचीरोली प्रशासन प्रयत्नरत असल्याचे सांगितले जात आहे. या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी लागवड व ड्रॅगन फ्रुटचे लागवडीसाठी सुमारे 90 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा तसेच त्यांना फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्ह्यात सुरू आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट व स्ट्रॉबेरी लागवडीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
यासाठी प्रत्येकी 50 लाखांची तरतूद केल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी नमूद केले. निश्चितच अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा यामुळे शेती व्यवसायात विशेषता फळबाग लागवडीत आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी वाटचाल करेल यात तिळमात्रही शंका नाही.
दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर जोमात कामकाज सुरू असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने गडचिरोली जिल्ह्यासमवेतच राज्यातील शेतकरी बांधव खरिपाचे नियोजन करण्यासाठी पुढे सरसावला आहे.
Share your comments