1. बातम्या

नोकरदारांसाठी खुशखबर! ऑगस्टपासून सुट्टीच्या दिवशीही होणार पगार

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) महत्त्वाची घोषणा केली आहे. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टम (National Automated Clearing House) (NACH) सर्व दिवस उपलब्ध राहणार असल्याची घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही सिस्टम कार्यरत राहणार आहे. शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
ऑगस्टपासून सुट्टीच्या दिवशीही होणार पगार

ऑगस्टपासून सुट्टीच्या दिवशीही होणार पगार

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) महत्त्वाची घोषणा केली आहे. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस  सिस्टम (National Automated Clearing House) (NACH) सर्व दिवस उपलब्ध राहणार असल्याची घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही सिस्टम कार्यरत राहणार आहे. शक्तिकांता दास (Shaktikanta Das) यांनी आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता रविवार आणि बॅंक हॉलिडेसारख्या सुट्टीच्या दिवशीदेखील  नोकरदारांचे पगार जमा होणार आहेत.  १ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे डिव्हिडंड, व्याजदर, वेतन, पेन्शन, विजबिले, गॅस बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, कर्जासाठीचे हफ्ते, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, विम्याचे हफ्ते इत्यादी सर्व बाबींची पूर्तता आता रविवारी, बॅंक हॉलिडे आणि इतर सुट्टयांच्या दिवशीदेखील करता येणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्राहकांना किंवा खातेधारकांनी ऑटो डेबिटची सुविधा ऑन केल्यानंतरही बॅंक हॉलिडे, सरकारी सुट्टया आणि रविवार या दिवशी ऑटो डेबिटची सुविधा अंमलात येत नव्हती. त्यामुळे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नोकरदारांचे पगार जमा होत नव्हते. नव्या नियमानुसार रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीदेखील ऑटो डेबिट सुविधा कार्यरत राहणार आहे. त्यामुळे खातेधारकांना यापुढे ज्या दिवशी ऑटो डेबिट होणार आहे तो दिवस रविवार किंवा सुट्टीचा असला तरीदेखील खात्यात बॅलन्स राखावा लागणार आहे. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल.

 

याआधी ज्या दिवशी तुमच्या खात्यातून ऑटो डेबिटद्वारे रक्कम कापली जाणार होती तो दिवस जर रविवार किंवा सुट्टीचा असला आणि खात्यात आवश्यक बॅलन्स नसला तर दंड आकारला जात नव्हता. दुसऱ्या दिवशी खात्यात पुरेशी रक्कम जमा करण्याची सुविधा होती. आता मात्र रविवार असो की सुट्टीचा दिवस ऑटो डेबिटद्वारे त्याच दिवशी पैसे कापले जातील.

एनएसीएच ही एक बल्क पेमेंट म्हणजे मोठ्या रकमेचे पेमेंट करण्यासाठीची यंत्रणा आहे. अनेक व्यक्तींच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा करण्यासाठीची ही लोकप्रिय आणि डिजिटल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यंत्रणा आहे. या यंत्रणेमुळे कोरोनाच्या संकटकाळात सरकारला नागरिकांच्या खात्यात वेळेवर आणि पारदर्शकरित्या पैसे जमा करता येत आहेत, असे आरबीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एनएसीएच सिस्टम सध्या ज्या दिवशी बॅंका कार्यरत आहेत त्याच दिवशी उपलब्ध असते.

 

मात्र ग्राहकांना सुविधा पुरवण्यासाठी आणि आरटीजीएस सुविधा वर्षातील सर्व दिवस उपलब्ध झाल्याचा फायदा घेण्यासाठी एनएसीएच सिस्टम देखील आठवड्याचे सर्वच दिवस आणि सर्व वर्षभर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२१ पासून उपलब्ध होणार आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

English Summary: Good news for employees! Salary will also be on holiday from August Published on: 05 June 2021, 02:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters