नंदुरबार : केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आता मिळणार आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारीपर्यंत किसान क्रेडिट कार्ड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.
यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड मोहिमेचा लाभ
किसान क्रेडिट कार्ड मोहिमेंतर्गत दुग्ध व्यावसायिक, शेळीपालक अथवा क्रेडिट कार्ड कुक्कुट पालन करणारे पशुपालक ज्यांच्याकडे किसान नाही, अशा जिल्ह्यातील सात हजार ७०२ पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ लाभ देण्यात येणार आहे. ज्या पशुपालकांकडे शेती असेल त्यांच्याकडील किसान क्रेडिट कार्डची पतमर्यादा वाढवून मिळेल परंतु व्याज सवलत फक्त तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी राहील. कर्जाकरिता व्याज सवलत दर दोन टक्के राहील, तर वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ देण्यात येईल.
शेतकऱ्यांना मिळणार खेळते भांडवल
किसान क्रेडिट कार्ड मोहिमे ही योजना पशुपालनासाठी खेळते भांडवल उपलब्ध होण्याकरता आहे. एका गायीला १२ हजार रुपये , एका म्हशीसाठी १४ हजार रुपये, शेळी गटकरिता १२ हजार ५०० रुपये ते २० हजार रुपये, तर १०० ब्रॉयलर कुक्कुट पक्ष्यांकरिता आठ हजार रुपये, लेअरसाठी १५ हजार रुपये आणि गावठी पक्ष्यांकरिता ५ हजारांपर्यंत खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. हे खेळते भांडवल जनावरांचे पशुखाद्य, औषधोपचार, तसेच विमा आणि तत्सम खर्चाकरिता उपलब्ध होणार असून , यामुळे पशुपालकाला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी हातभार लागणार आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ६०० अर्ज प्राप्त झाले असून त्यावर जिल्हा अग्रणी बँकेमार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे .
कोणत्याही तारणाशिवाय मिळणार कर्ज
सर्वसाधारणपणे कोणत्याही तारणाशिवाय पशुसंवर्धनविषयक किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा (खेळते भांडवल) १ लाख ६० हजार आहे; परंतु जो संलग्न आहे त्यांना प्राधान्य राहील. पशुपालक शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूध संघ, दूध उत्पादक कंपनीशी शिवाय कर्ज परत करण्याचा त्रिपक्षीय करार (दूध सोसायटी, संघ, बँक आणि पशुपालक) करून कर्ज परत करण्याची हमी देत असेल त्यांना कोणत्याही तारणाशिवाय ३ लाख रुपयांच्या मर्यादेत पशुसंवर्धनविषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ घेता येईल . ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरिता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे .
Share your comments