शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी आणली आहे. “किसान रक्षा कवच” हा वैयक्तिक अपघात गट विमा कार्यक्रम सुरू केला अँग्रोस्टार कंपनीने सुरु केला आहे. शेतकऱ्याला मोफत 2 लाखांचा वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी मिळणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
शेतकऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी “किसान रक्षा कवच” कार्यक्रम अँग्रोस्टार अँपवर सादर करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचे संरक्षण होईल आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षितता मिळेल. हा कार्यक्रम शेतकर्यांचे जीवन सुधारेल आणि त्यांच्यासोबतचा आमचा विश्वास आणि संबंध मजबूत करेल. अशी खात्री अँग्रोस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी शार्दुल शेठ यांनी दिली आहे.
या विमा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी एक अट ठेवली आहे. अँग्रोस्टार अँपद्वारे कृषी निविष्ठा खरेदी करणार्या समूह विमा कार्यक्रम सुरू करण्यासाठी केअर हेल्थ इन्शुरन्स आणि ग्रामकव्हर यांनी सहकार्य केले आहे. ही समूह विमा पॉलिसी केअर हेल्थ इन्शुरन्सद्वारे विमा उतरवली जाते. ग्रामकव्हर डिजिटल पद्धतीने प्रक्रिया सुलभ करत आहे. देशातील 50 लाखांहून अधिक शेतकरी शेतीविषयक सल्ल्यासाठी आणि उच्च-गुणवत्तेची, तसेच अद्वितीय कृषी उत्पादने मिळवण्यासाठी अँग्रोस्टार अँपवर अवलंबून आहेत.
शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर गट विमा संरक्षण सुरू करण्यात आले आहे. अँग्रोस्टार अँप वापरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. याचा लाभ तुम्ही पण घ्या.
Share your comments