पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात यावा. या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला.
पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांना दोन हप्ते वितरित करणे शक्य आहे. पावसाने ओढ दिलेल्या क्षेत्रातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या रकमेचीही मदत होऊ शकते.
त्यादृष्टीने तातडीने पहिला हप्ता वितरित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेतील निकषांची पूर्तता न झालेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवली जात आहे.
यांतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता केली आहे. सर्व उर्वरित पात्र शेतकरी बांधवांनी ई-केवायसी, भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून या दोनही योजनांचा लाभ घ्यावा.
सोमेश्वर कारखान्याने ३,५५० रुपये दर द्यावा, जाणीवपूर्वक दोनशे रुपये दर कमी केला- सतीश काकडे
जर पूर्तता केली नाही तर याला अडचण येऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना विनाअडथळा पैसे मिळतील.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार, धोम, कण्हेर, कोयना व महु हातगेघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मोठा निर्णय..
मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सरकारकडून हालचाली, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महत्वाचे आदेश...
Share your comments