मुंबई
राज्यात रिक्त असलेल्या तलाठी पदांसाठी भरती सुरु आहे. जवळपास राज्यात ४ हजार ६४४ जागांसाठी महसूल आणि वनविभागाने पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पण अर्ज भरताना सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एका दिवसाने वाढविण्याचा निर्णय महसूल व वनविभागाने घेतला आहे.
तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची सोमवारी (ता.१७) संपलेली मुदत मंगळवारी (ता.१८) रात्री उशिरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज दाखल करू न शकलेल्यांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी २६ जून ते १७ जुलै पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते..
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी सोमवारी १७ जुलै शेवटचा दिवस होता. अशात सकाळी ११ वाजेपासूनच वेबसाईट बंद होती.
दरम्यान, गावपातळीवर तलाठ्यांमार्फत महसूल विभागाचा कारभार सुरु असतो. मात्र राज्यात सुमारे चार हजारहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. ही बाब राज्य सरकारने लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यात रिक्त असलेली तलाठ्यांची पदे भरण्याची निर्णय घेतला आहे.
Share your comments