गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच गंभीर होत चालला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे आता राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
यामध्ये आता गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच राहणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच एक मेनंतर गाळप झालेल्या सर्व उसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टनाप्रमामे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी 100 कोटी रुपये लागणार आहेत. याचा भार राज्य सरकारवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत 200 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात एक मे 2022 नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे 52 लाख टन गाळप अपेक्षित आहे. चालू हंगामात तब्बल 2.25 लाख हेक्टर जादा ऊस क्षेत्र वाढले आहे. यामुळे साखरे कारखान्यांचे नियोजन कोलमडले. यामुळे शेतकऱ्यांना सध्या ज्यादा पैसे देऊन ऊस तोडावा लागतोय.
आता मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण गाळप होईलपर्यंत साखर कारखाने सुरूच ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने आता तरी सगळा ऊस तोडला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
मित्रांनो गोड आंबा कसा ओळखावा? आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' टिप्स
भारतातलं पहिलं 'मधाचं गाव' महाराष्ट्रात, शेतकरी कमवतात लाखो रुपये, जाणून घ्या...
Amazon Fresh Offer: फक्त एका रुपयामध्ये एक किलो पीठ, इतर किराणा सामानावर देखील मोठी ऑफर
Share your comments