राज्यात गेल्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने अन्नधान्य उत्पादनात सरासरीच्या ३९ टक्के वाढ आहे. अन्नधान्य पिकाचे एकूण १६५.०२ लाख मेट्रिक टन एवढे उत्पादन झाले. यंदाही सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने कृषी विकासदर सुधारण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यामध्ये मागील वर्षी झालेल्या कृषी उत्पादनाचा अंदाज घेण्यात आला. खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये अन्नधान्य ८१.६० लाख टन, खरीप गळीत धान्य ५६.७१ लाख टन, कापूस ७१.२० लाख गाठी व ऊस ११३९.३३ लाख टन इतके उत्पादन झाले आहे.
यंदा राज्याचे खरीप हंगाम सन २०२२ मधील लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४६.८५ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर, सोयाबिन पिकाखाली ४६ लाख हेक्टर, भात १५.५० लाख हेक्टर, कापूस ९.५० लाख हेक्टर, कडधान्य पिकाखाली २३ लाख हेक्टर क्षेत्र आणण्याचे नियोजन आहे. खरीप हंगामासाठी १७.९५ लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे.
महाबीज, राष्ट्रीय विषाणे महामंडळ व खासगी संस्थेकडे मिळून १९.८८ लाख क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नांनी आणि सहकार्याने खरीप हंगाम यशस्वी होईल असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा! शेतकऱ्यांना देणार मोफत भाज्या, कडधान्य..
काबाडकष्ट करत असताना शेतकरी बांधवांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अशा शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी असेहि निर्देश ठाकरेंनी या बैठकीत दिले.
महत्वाच्या बातम्या;
पुराच्या पाण्यात पाय भिजतील म्हणून भाजप आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर
40 गोणी कांदा, शेतकऱ्याला आडतवाल्यालाच द्यावे लागले 7 रुपये, सांगा कसा जगणार शेतकरी
मोठी बातमी! राज्यात पुन्हा शेतकऱ्यांनाचा संप? सोमवारी होणार मोठा निर्णय
Share your comments