शेतकऱ्यांनी वीज भरले नाही की, लगेच महावितरण वीज कापते. पिकाला पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होते. पण आता मात्र, महावितरणाचा गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणाचा गलथान कारभार पुन्हा एकदा पाहावयास मिळाला आहे. पुण्यातील नारायण गावात महावितरणमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
नारायण गावात काल अचानक कळमजाई मळ्याला अचानक आग लागली. तिथे वस्तीवर कोणीही नसल्यामुळे तेथील दहा ते बारा एकरांचा ऊस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतीच्या कामासाठी वापरा जाणारा अमित रोहिदास भोर यांचा ट्रॅक्टर (tractor) सुध्दा जळाला आहे. घटना घडली तेव्हा तिथे कोणीही नसल्याने आग लागल्याची बातमी तात्काळ लोकांना समजली नाही. महावितरण अधिका-यांंवर शेतकरी वर्गातून टीका करण्यात येते आहे.
आगीच्या झालेल्या घटनेमध्ये अनेक शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला आहे. अर्जुन भोर, विठ्ठल भोर, विष्णु भोर, इंदुबाई कुरकुटे, हनुमान खंडागळे आणि बारकु भोर या शेतक-यांचा ऊस जळाला आहे. महाविरणाचा गलथान कारभार वारंवार उघडकीस येत आहे. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आत्तापर्यंत राज्यात शॉर्टसर्किटमुळं अनेक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे.
नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी अशी तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे. चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी तात्काळ कारखान्याचे खोडद गटप्रमुख रमेश जाधव, फिल्डमन पवन गाढवे यांना घटनास्थळी पाठवुन पाहणी करुन दोन दिवसात जळालेल्या उसाची तोडणी करणार असल्याचे सांगितले आहे.
Share your comments