शेतकरी लेकाची ‘सुवर्ण’ किमया, नीरजच्या भाल्याला कोटीची मागणी
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra modi) मिळालेल्या भेटवस्तूंची ई- लिलाव प्रक्रिया सध्या सुरू आहे. ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्यावर सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे. सांस्कृतिक मंत्रालय मार्फत पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये सर्व विजेत्यांना मिळालेल्या पदकांचा लिलाव करून त्याची बोली ठरवली जाते.

टोकियो ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने पंतप्रधान मोदी यांना भाला भेट दिला होता. भाल्यावर नीरज चोप्रा याची स्वाक्षरी होती. सर्वाधिक 1.5 कोटी रुपयांची बोली त्यावर लावण्यात आली होती. भवानी देवी यांनी स्वाक्षरी केलेल्या तलवारीवर देखील सव्वा कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
नीरज सोबतच अन्य खेळाडूंनीही भेटवस्तू पंतप्रधानांना भेट दिल्या होत्या. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि भवानी देवी यांच्यासह अन्य खेळाडूंचा भेट देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश होता.
ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत नीरज चोप्राच्या भाल्याचे बेस मूल्य 80 हजार रुपये ठेवण्यात आले होते. लिलाव प्रक्रियेत बोली किंमत 1.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पी. व्ही. सिंधू हिच्या बॅडमिंटनची किंमत 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
ऑनलाईन लिलाव
ऑनलाईन लिलावाच्या प्रक्रियेला 17 सप्टेंबर ला सुरूवात करण्यात आली होती. सांस्कृतिक मंत्रालयाने संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रण केले. या लिलावात भाल्यासोबत अन्य 1300 वस्तूंचा देखील समावेश होता.
लिलावातून नमामी गंगे
लिलावातून प्राप्त होणारी रक्कम नमामि गंगे मोहिमेला दान केली जाणार आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट यांनी अनेक वस्तूंचा ऑनलाईन लिलाव केला होता. या लिलावातून प्राप्त होणारी रक्कम नमामि गंगे मिशनला दान केली जाईल.
English Summary: golden performence of farmer son niraj chopra srear demand in crore rupeesPublished on: 09 October 2021, 06:59 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments