आपल्या पृथ्वीवर अशा काही वनस्पती आहेत की त्याला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे. मात्र त्याचे उत्पादन देखील फारच कमी असते, तसेच कशी कशाला भाव वाढेल हे देखील सांगता येत नाही. यामुळे काहीजण कमी काळातच करोडपती देखील होतात. यामध्ये रक्तचंदनाचा समावेश होतो. याचा वापर धार्मिक कार्यासाठी वापरले जाते. त्याचा वापर विशेषतः शैव पंथीयांमध्ये प्रामुख्याने केला जातो. यामुळे याला विशेष असे महत्व आहे. रक्तचंदनाचे लाकूड हे लाल रंगाचे असते. अनेक मोठ्या जंगलात हे झाड सापडते, याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. रक्त चंदनाचे काही औषधी गुणधर्म आहेत.
यामध्ये ते सूज कमी करते, सुजलेल्या भागावर रक्तचंदन उगाळून लावतात. याशिवाय रक्तचंदनापासून महागडे फर्निचर, सजावटीचे सामान,सौन्दर्य प्रसाधने, मद्य बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. प्रदेशात याला मोठी मागणी असते. नुकत्याच आलेल्या पुष्पा या चित्रपटात याबाबत सगळी कहाणी सांगितली गेली आहे. याची मागणी चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात या भागात रक्त चंदनाची मागणी आहे. इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये याला जास्त मागणी आहे. चीनमध्ये याचा फार जुन्या काळापासून याचा वापर केला जात आहे. रक्तचंदन किंवा पांढरे चंदन या दोन्ही प्रकारच्या चंदनाची लागवड शेतकऱ्यांना करता येते. मात्र त्याची काळजी देखील मोठ्या प्रमाणात घ्यावी लागते.
याच्या शेतीसाठी शासनाकडून अनुदान मिळते. असे असले तरी याबाबत तुम्हाला तलाठयाकडे जाऊन याची नोंदणी करावी लागते. तसेच तुम्ही जेथून याची रोपे खरेदी करत असाल त्या रोपवाटिकेला याची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्याकडे त्याची पावती देखील असणे गरजेचे आहे. याची तोड करताना तुमची तलाठ्याकडे नोंद असेल तर काही अडचण येत नाही. यामुळे वनविभागाची परवानगी घ्यावी लागणार नाही. रक्तचंदन आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांत पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्ये आढळते. याठिकाणी मोठे जंगल आहे. मात्र तरी देखील येथे याची मोठी तस्करी केली जाते, यामुळे अनेकदा येथे या वादात अनेकांचे जीव देखील गेले आहेत.
रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते. हे झाड सावकाश वाढते. लाल चंदनाच्या लाकडाची घनताही अधिक असते. हे रक्तचंदनाचे लाकूड इतर लाकडांपेक्षा अधिक वेगाने पाण्यात बुडते तीच त्याच्या खऱ्या शुद्धतेची ओळख असते. याच्या शुद्ध लाकडाला मोठी मागणी असते. यामुळे याची शुद्धता ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. अनेकांच्या घरात पारंपरिक नुसखा म्हणून रक्तचंदनाची बाहुली असते, तसेच आपल्या घरातील जुनी माणसे याबाबत आपल्याला अनेक गोष्टी सांगतील.
Share your comments