गोकुळ दूध संघाने ११ जुलै पासून दुधाच्या दारात वाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये म्हैसीचे दूध २ रुपये व गायीच्या दुधात १ रुपयाने वाढ करत असल्याचे राज्याचे पालक मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. दूध खरेदी दर वाढीमुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर भागात दूध विक्री दर सुद्धा वाढविण्यात आलेला आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील दूध विक्रीचा दर वाढला:
कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर ठिकाणी दुधाचे विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली असून जिल्हा बँकेकडून ज्यांना जमीन नाही त्या शेतकऱ्यांना २ म्हैसी पर्यंत विनातरण कर्ज देणार अशी हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे, तसेच हसन मुश्रीफ यांनी असेही सांगितले की गोकुळचा २० लाख लिटर संकलन चालू आहे तो टप्पा आम्ही लवकर पूर्ण करणार आहे.
हेही वाचा:डेअरी उद्योगाची चिंता वाढली;50 हजार टन दूध भुकटी पडून
सध्या दर किती?
सध्या गोकुळ दूध संघ म्हशीच्या दुधाला ३९ रुपये दर देत आहे तसेच गाईच्या दुधाला २६ रुपये दर देत आहे.गोकुळ दूध संघाने ११ जुलै पासून म्हैसीच्या दुधाला २ रुपये ने वाढ करत आहे तर गाईच्या दुधाला १ रुपये लिटर ने वाढ करत आहे तसेच कोल्हापूर जिल्हा वगळता इतर ठिकाणी सुद्धा दूध विक्रीमध्ये २ रुपये वाढ झालेली आहे. मुंबईसह राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गोकुळ चे दूध विकले जाते त्या ठिकाणच्या ग्राहकांना दूध विकत घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
गोकुळ निवडणूक:
मागील महिन्यात गोकुळ दुध संघ मध्ये निवडणूक झाली त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आघाडीने विजय मिळवला. गोकुळ संघ दूध संकलनावर सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी दणदणीत विजय मिळवला. गोकुळ दूध संघ मध्ये २१ जागा होत्या त्यामध्ये १७ जागा काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मिळाल्या तर आधी सतेवर असणारे महादेवराव महाडिक याना ४ जागेवरच शांत बसावे लागले.
Share your comments