जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांत अतिवृष्टीने प्रचंड हाहाकार माजवला आहे. अतिशय विदारक असे चित्र आहे. या भागातील नागरीकांवर कोसळलेले दुःखद शब्दात न व्यक्त होणारे आहे. काल सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत संग्रामपूर तालुक्यातील १७ गावांमध्ये जात नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर दिला.
त्यानंतर गाडेगाव बु. शिवारातील भोटा पुनवर्सन भागातील जिल्हा परिषद शाळेतच मुक्काम केला. तर आज सकाळ पासून जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बु., गाडेगाव खुर्द, नवे गोळेगाव, टाकळी खासा, टाकळी पारस्कार, कुरनगाड, चावरा, इलोरा, मडाखेड बु. मडाखेड खुर्द, येनगाव, वडशिंगी, जामोद, जळगाव, आसलगाव यासह अन्य गावांत पूरग्रस्त घरांची व प्रत्यक्ष बांधावर जावून शेतीची पाहणी करून नागरिकांच्या भेटी घेतल्या.
दोन्ही तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर झाले आहेत. अंदाजे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे, तर मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. एवढा हाहाकार या अतिवृष्टीने माजवला की एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं..! माय- माऊल्यांशी बोलतांना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, इथल्या लोकांचं दुःख बघवत नाही.
त्यांना धीर तरी कोणत्या तोंडाने द्यायचा..? अतिशय कठीण प्रसंग इथल्या नागरिकांवर आलेला आहे. डोळ्यात पाणी आणणारी ही सर्व परिस्थिती आहे. राज्य व जिल्हा पातळीवरील अधिकारी, महावितरणचे विभागीय अधिकारी व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून नागरिकांना येणाऱ्या बारीकसारीक अडचणी विषयी त्यांना अवगत केले आहे.
ऊस तोडणी यंत्र वापरातील आव्हाने
त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. तसेच पुर ओसरल्यावर रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याने, त्यावर तातडीने उपाय योजना करण्यासंदर्भात प्रशासनाला अलर्ट केले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी माहिती दिली आहे.
दुधाला 34 रुपये दराचा शासनाचा अध्यादेश म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार! राजू शेट्टी यांनी थेट फसवणुकीचे उदाहरणच दिले
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या ग्राफिक्स वरील वक्तव्यावर खुलासा, राजू शेट्टी यांना केला फोन, आणि...
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
Share your comments