महाराष्ट्रात बऱ्याच भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.या झालेले नुकसान ची तक्रार त्या पद्धतीने करायची असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेल्या नुकसानीबद्दल पेच होता तो झालेल्या नुकसानीची विमा कंपनी कडे कोणत्या पद्धतीने तक्रार नोंदवायची? सुरुवातीला केवळ ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते.परंतु नुकसानीची सर्व प्रकारची माहिती ॲपद्वारे भरणे शक्यच नव्हते. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची होणारी तारांबळ पाहताकृषी आयुक्तालयाने आता वेगवेगळे असे सहा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.ते सहा पर्याय कोणतेते जाणून घेऊ.
कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध करून दिलेले सहा पर्याय
- शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायचे आहे.ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी हे पंचनामे साठी शेतक-यांच्या बांधावर येणार आहेत.
- तसेच तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी या कार्यालयात ऑफलाइन तक्रार करू शकतात.
- तसेच झालेल्या नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही नोंदविता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा अर्ज द्यावा लागणार आहे.
- पिक विमा कंपनीच्या mumbai@aiconfindia.com/pikvima@aicofindia.comया मेल आयडीवर देखील तक्रार करता येणार आहे.
- ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेत सुद्धा शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.
- 18004195004 आजचा कंपनीचा टोल फ्री क्रमांक असून याद्वारे हे शेतकरीनुकसानीची माहिती देऊ शकतात.
Share your comments