सध्या शेतकरी चोहोबाजूंनी संकटांनी घेरले जात आहेत. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी व पिकांचे झालेले मोठे नुकसान या संकटातून बाहेर निघत नाही तोपर्यंत रब्बी हंगामावर आलेले अवकाळी चे संकट यामुळे शेतकरी पुरते खचले आहेत
त्यातच यावर्षी खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.रब्बी हंगामामध्ये प्रचंड प्रमाणात खतांची टंचाई भासत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही खत विक्रेते छापील किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री करीत आहेत,असे गंभीर प्रकार समोर येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरशेतकऱ्यांची होणारी लूट होऊ नये,कृषी विभागाने ताबडतोब एक स्वतंत्र व्हाट्सअँप क्रमांक शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा अशी सूचना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून कृषी विभागाला करण्यात आली आहे.
खतांच्या उपलब्धतेच्या प्रश्नावर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.अशामध्ये ज्या शेतकऱ्यांना खते आणि औषधे तसेच बियाणं बाबतीतकृषी विभागाकडे तक्रार करायची असेल असे शेतकरी दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर तक्रार करतील.
विभागाने हा उपक्रम सुरू केल्यास राज्यातील शेतकऱ्यांसाठी तो खूपच फायद्याचा ठरेल तसेच शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल असे संघटनेकडून कळविण्यात आले आहे. यावर आता कृषी विभाग काय कार्यवाही करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.(स्रोत-ॲग्रोवन)
Share your comments