पीककर्ज हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असून आता खरीप हंगामाची तयारी सुरु असताना शेतकर्यांना पीककर्जाचे नितांत गरज आहे .
परंतु काही राष्ट्रीयीकृत बँका आजही पिक कर्ज देताना आखडता हात घेत असूनशेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज उपलब्ध झालेच पाहिजे.कारण शेतकऱ्यांना अगदी वेळेत पिक कर्ज दिले तर त्याचा शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
तसेच बँकांची पीककर्ज बाबतची भूमिका ही चुकीची असल्याचे देखील त्यांनी म्हटले. महत्त्वाचे म्हणजेपुढे बोलताना ते म्हणाले की रासायनिक खते आणि बियाणे यांच्या बाबतीत देखील शेतकऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी येत असल्यामुळे मी त्या तक्रारीची दखल घेतली असूनजर अशा चुकीच्या दराने खते आणि बियाणे विक्री जात असेल
तर संबंधितांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे देखील यावेळी दादा भुसे म्हणाले.एबीपी माझाने आयोजित केलेल्या महाचर्चा मध्ये दादा भुसे सहभागी झाले होते, त्या प्रसंगी त्यांनी संबंधित भूमिका मांडली.या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले.
पिकविमा विषयी दादा भुसे यांचे मत
पिक विमा विषयी बोलताना ते म्हणाले की पिक विमा योजनेच्या अटी असतात या केंद्र सरकारकडून ठरवल्या जातातआणि त्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम हे राज्य सरकारचे असते. यावेळी बोलताना 2020 या वर्षाची परिस्थिती त्यांनी विशद केली. त्याविषयी ते म्हणालेके 2020 मध्ये शेतकऱ्यांना खूप कमी विमा परतावा मिळाला ही वस्तुस्थिती आहे
परंतु कारण जे जे काही नुकसान झालेले होते ते कंपन्यांना कळु शकले नसल्याचे देखील भुसे म्हणाले.तसेच पीक विमा बाबतीत चर्चेत असलेले बीड मॉडेल महाराष्ट्रात लागू करावे. यामध्ये विमा कंपन्यांच्या अमर्यादित नफ्याला मर्यादा आहे. त्यामुळे बीड मॉडेल सबंध राज्यात लागू करण्याचे देखील मागणी केंद्राकडे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच 2021-22 या वर्षात नियमांचे पालन करून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याचे देखील ते म्हणाले. चालू वर्षांमध्ये पीक विमा योजनेमध्ये 82 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
यापैकी 45 लाख शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे कळवले. अशा शेतकऱ्यांची रक्कम 44 शे कोटी रुपये होती. त्यातील ते 33 शे कोटी रुपये मिळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असे त्यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतकऱ्यांचा ऊस गेला वाळून आता तोडूनही होणार नाही उपयोग; अजूनही कारखाने सुरु
नक्की वाचा:दाखवून दिले! परिस्थितीवर स्वार होऊन ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर
Share your comments