आपण मागील एक ते दोन वर्षापासून सातत्याने पाहत आहोत की उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे. यामध्ये हवामानातील बदल, ग्लोबल वार्मिंग इत्यादी कारणे सांगितली जातात.
आता महाराष्ट्राचा विचार केला तर अगोदर काही वर्षांपूर्वी नागपूर म्हणजेच एकंदर विदर्भाचा विचार केला तर चाळीस अंशांच्या पुढे तापमान असायचे. परंतु आता तर जळगाव, नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये देखील 44 अंशाच्या पुढे तापमान आहे. यावरून या तापमान वाढीचा अंदाज येतो. यावर्षी देशातील बहुतेक राज्यांमध्ये कमाल तापमानात खूपच वाढ झाली आहे. भारतातच नव्हे तर पाकिस्तान मध्ये देखील हीच परिस्थिती आहे. या सगळ्या तापदायक पार्श्वभूमीवर येणाऱ्या मे आणि जून महिन्यात हवामानाची स्थिती कशी राहील याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येणाऱ्या महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचं संकट अधिक भयानक होण्याची शक्यता आहे. येत्या मे आणि जून महिन्यात या महिन्याच्या तुलनेत जास्त प्रमाणात उष्णता जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये स्कॉटलंडमधील हवामान शास्त्रज्ञ स्कॉट डंकन यांनी याबाबत इशारा देताना भारत आणि पाकिस्तानच्या देशाने अत्यंत धोकादायक अशी उष्णतेची लाट वाढत असल्याचे म्हटले आहे.
टीव्ही नाईन हिंदी ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत असून बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र झालेली आहे. या तुलनेमध्ये येणाऱ्या मे आणि जून महिन्यात अधिक तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते असा इशारा देखील हवामान तज्ञांनी दिला आहे. स्कॉटलंड चे हवामान तज्ञ स्कॉट डंकन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एका थ्रेडमध्ये म्हटले आहे की भारत पाकिस्तान च्या दिशेने धोकादायक अशी उष्णतेची लाट वाढत आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की येत्या काही दिवसात तापमान उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान मधील काही भागात पारा पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत वाढु शकतो. जर जागतिक तापमानाचा विचार केला तर दरवर्षी सरासरी एक अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होत आहे.. कोरोना कालावधीमध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये बरेच प्रकल्प आणि कारखाने बंद होते. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ देखील बंद होती. या कारणांमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जनात मोठी घट झाली होती. परंतु हे निर्बंध हटवल्या गेल्यानंतर यामध्ये उच्चांकी वाढ झाल्याने आता तापमान कमी होण्यासाठी डीकार्बनायजेशन गरज आहे.
असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.पुढे स्कॉट यांनी म्हटले आहे की, जसजशी आपल्या ग्रहांचा तापमान वाढतं, तस-तशी उष्णतेची लाट अधिक तीव्र होते. या भागांमध्ये वर्षातला बहुतांश काळ सर्वाधिक उष्णता जाणवते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:तरुणांनो संधीच सोनं करा! ICMR मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा कर्ज..
Share your comments