बाजारात टोमॅटो चे भाव कोसळल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. भाव एवढे कोसळले आहेत की लागवडीसाठी जो खर्च गेला आहे तो सुद्धा त्यामधून निघाला नाही यामुळे शेतकरी खूप संतापात गेला आहे.अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सांगितले आहे की राजकारण थांबवून जे की एकमेकांवर टीका करत बसण्यापेक्षा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या नाहीतर सत्ताधारी असो किंवा विरोधक त्यांच्या दारापुढे टोमॅटो चा ढीग लावला जाईल.
शेतकऱ्यांना दिलासा तरी भेटेल:
अजित नवले म्हणाले की अचानक बाजारात टोमॅटो चे भाव कोसळल्याने राज्यातील टोमॅटो उत्पादक संकटात सापडलेले आहेत आणि अशा अवस्थेत शेतकरी पोहचले असल्यामुळे शेतकरी रस्त्यावर, ओढे, नाले च्या बाजूला टोमॅटो फेकून देत आहेत आणि यावर कोणत्याही राजकारण्यांच लक्ष नाही त्यामुळे एकमेकांवर टीका करण्यापेक्षा इकडे लक्ष दिले तर बरं होईल त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तरी भेटेल.
हेही वाचा:‘या’ शेतकर्यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ
शेतकऱ्यांबद्दल कुणालाही दया नाही, मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदतो शेतकऱ्यांची दया कोणाला सुद्धा येत नाही जे की कोरोना काळात शेतकऱ्यांनी देश जगवला आहे मात्र अत्ता सर्व जण आपल्या आपल्या कामात व्यस्थ आहेत.सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दयावा. कोल्ड स्टोरेजचा वापर करून माल साठवता येईल तसेच कर्ज देता येईल का असे अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे मत अजित नवले यांनी मांडलेले आहे.
अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टॉमेटो ओतणार:-
सरकारने जर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर सत्ताधारी तसेच विरोधकांच्या दारासमोर किसान सभा भरवल्या जातील आणि टोमॅटोचे ढीग घातले जातील, असा थेट इशारा अजित नवले यांनी दिलेला आहे.राज्यात भाव कोसळल्या मुले शेतकरी वर्ग खूप मोठया संकटात अडकलेला आहे आणि यावर कोणताही पुढारी नेता लक्ष देत नाहीत प्रत्येक जण एकमेकांवर टीका करण्यात व्यस्थ आहेत.जे की इकडे शेतकरी वर्ग आत्महत्या चे दार उगडून बसला आहे मात्र याची चिंता ना सत्ताधारी पक्षाला आहे ना विरोधक लोकांना आहे. त्यामुळे किसान सभा नेते अजित नवले यांनी ईशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अशी आशा आहे की सरकार आपल्याला काही तरी मदत करेल.
Share your comments