परप्रांतीय मजुरांच्या रिक्त जागांवर स्थानिकांना नोकरी द्या : मुख्यमंत्री

13 May 2020 06:15 PM

मुंबई-  देशात कोरोना व्हायसरने थैमान घातले आहे. आता पर्यंत ७४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान देशात या व्हारसचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात कामे उद्योग बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना मोठी झळ पोहचली आहे. इतर राज्यात अडकलेले मजूर आपआपल्या घरी जात आहेत. महाराष्ट्रात असलेले इतर राज्यातील मजूरांनीही आपल्या घराचा रस्ता पकडला आहे. यामुळे पुढील काळात मजुरांची तुटवडा वाढणार आहे. दरम्यान उद्योग व्यवसायातील परप्रांतीय मजुरांच्या जागेवर राज्यातील युवकांना काम द्यावे अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सुरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पाहा व स्थानिकांना काम उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

१७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे. पावसाळाही लवकरच सुरू होणार असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल या दृष्टीने खासगी डॉक्टर्सना ते नियमितरीत्या आपल्या सेवा सुरू करतील हे पाहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्या-जिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत, असे सांगून कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, या झोनमधून विषाणू बाहेर जाणार नाही याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

maharashtrian people outsiders jobs महाराष्ट्रीयन नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य कामगार परप्रांतीय कामगार लॉकडाऊन कोरोना व्हायरस स्थानिकांना परप्रांतीयाच्या जागेवर कामे chief minister uddhav thackeray
English Summary: give jobs to maharashtrian people replacement of outsiders - cm

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.