राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 49 वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक परभणी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीमध्ये चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांचे वाण तसेच पंधरा कृषी अवजारे आणि 195 शिफारशींना मान्यता देण्यात आली आहे.
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या मान्यता दिलेला असून यावेळी दादाजी भुसे यांनी 2022 हे वर्ष जागतिक पातळीवरील उपयुक्त, असे कृषी संशोधन राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल यासाठी चारही कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
राज्यातील चार कृषी विद्यापीठांनी मान्यता दिलेली शेती पिके आणि फळपिकांच्या वाण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाणे तीन विकास विद्वानांना लागवड करिता मान्यता देण्यात आली यामध्ये सोयाबीनच्या एम ए यु 725, करडई पिकांचा परभणी सुवर्णा ( पिबीएनएस 154 ) आणि रब्बी ज्वारी हुरडा च्या परभणी वसंत ( पी व्ही आर एस जी-101) या आवाहनास मान्यता देण्यात आली.
त्यासोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारीच्या फुले यशोमती, उडदाच्या फुले वसु, तीळ पिकाच्या फुले पूर्णा तर उसाच्या फुले 11082 या वाहनांना लागवडीकरिता मान्यता देण्यात आली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विकास भात पिकांची पीडीकेव्ही साधना आणि रब्बी ज्वारी हुरडा ची ट्रॉम्बे अकोला सुरुची वानाला मान्यता देण्यात आली आहे. पळती काम मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधित पेरू फळाच्या फुले अमृत तर चिंच फळाच्या फुले श्रावणी वानास मान्यता देण्यात आली,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था मांजरी यांच्या द्राक्षाचा मांजरी किसमिश वाण आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचा सोलापूर लाल या वाणस मान्यता देण्यात आली आहे. त्यासोबतच पंधरा कृषी अवजारे आणि यंत्र आधीचा 193 संशोधन शिफारसींना देखील मान्यता देण्यात आली आहे. एक आठवडाभर चाललेल्या या बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील जास्त शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला.
Share your comments