अकोला
पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत अंतिम मुदत आहे. पण तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पीक विमा काढण्याच्या मुदतीला २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि कृषिमंत्री धनजंय मुंडे यांच्याकडे केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ रुपयात पीक विमा योजना सुरु केली आहे. मात्र, आता पीक विमा काढताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी आमदार सावरकर यांची मागणी आहे.
दरम्यान, अद्यापही राज्यातील अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विचार करुन पीक विम्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी सरकारकडे केली आहे.
Share your comments