गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांची विजतोडणी केली जात आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून अजूनही अनेक ठिकाणी हा प्रकार सुरूच आहे. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना आता राज्याचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, वीज जोडण्यासाठी पैसे भरूनही आजवर कृषी पंप जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे आता याबाबत काय होणार हे लवकरच समजेल. याबाबत राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
ही थकबाकी भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शेतकरी मेळावे घ्या, तसेच ग्रामपंचायत पातळीवर बैठकी घेऊन “कृषी धोरण-2020″ची माहिती शेतकऱ्यांना द्या, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. कृषी पंपाच्या थकबाकीसोबतच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकर वीज जोडणी कशी मिळेल. जे कंत्राटदार कामे करण्यास हयगय करीत असतील अश्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले आहेत.
रिसोड- मालेगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या पुढाकाराने वाशीम जिल्ह्यातील वीज विषयक समस्यांचा आढावा ऊर्जामंत्री राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. यावेळी ते बोलत होते. वाशीम जिल्ह्यात सध्या उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत 431 शेती पंपाच्या वीज पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित आहे. याबाबत ही कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हा पातळीवर कृती आराखडा करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. तसेच महावितरणकडून विविध कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी राज्यात अवकाळी पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले. असे असताना ही विजतोडणी करून राज्यातीक शेतकरी जास्तच आक्रमक झाक आहे. काही गावांमध्ये या महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावर तोडगा निघाला नाही तर हा संघर्ष अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन पूर्वरत करण्याची मागणी केली आहे.
Share your comments