poultry business (image google)
पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर यांनी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या सचिवांकडे एक मागणी केली केली. यामध्ये राज्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो.
यामुळे विजेवर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे कुक्कुटपालकांना कृषिपंपाप्रमाणे सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याबाबत ऊर्जा विभागाला विनंती करून त्यामाध्यमातून ‘महावितरण’ला निर्देश द्यावेत, असे म्हटले आहे.
पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वय समितीचे गठण पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेवरून करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राजू शेट्टींची मोठी घोषणा! छोट्या पक्षांची एकजूट करत नव्या आघाडीची केली घोषणा...
यामध्ये बपोल्ट्री क्षेत्रातील विविध समस्यांसोबतच वीज दराबाबतचा मुद्दाही सातत्याने मांडण्यात आला आहे. यापूर्वी शासनास प्रस्ताव सादर केला होता. यावर निर्णय झाला नाही.
पीककर्जासाठी सीबिल स्कोरची अट रद्द करावी! सरकारचा नियम फक्त कागदावर बँका ऐकत नाहीत...
पशुपालकांच्या मागणीनुसार वीज देयक दरात दिलासा देण्यासाठी शासनाच्या ऊर्जा विभागास विनंती करून याबाबत ‘महावितरण’ला निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावर आता निर्णय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कांद्याचे दर वाढण्याची शक्यता, कमी पाऊस, नासाडी यामुळे उत्पादनावर परिणाम
टोमॅटो भाव कधी खाली येणार? टोमॅटो बाजाराचं चित्र कसं राहील, जाणून घ्या...
Share your comments