1. बातम्या

आनंदाची बातमी : पशुपालकांचा विकास करण्यासाठी आले धेनू अँप; शेतकऱ्यांचा होतोय फायदा, जाणून घ्या सविस्तर...

शेतकरी हे शेती व दुग्ध अवलंबून आहेत. व्यवसायावर दुग्धव्यवसाय हा जोडधंदा म्हणून जरी ओळखला जात असला तरी ग्रामीण भागात हा व्यवसाय सध्या प्रमुख व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. म्हणून ग्रामीण भागात अनेक कंपन्या शेती क्षेत्रामध्ये खुप चांगलं काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे ज्ञान व शेतीचे उत्पादन देखील वाढताना दिसून येत आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Dhenu app

Dhenu app

शेतकरी हे शेती व दुग्ध अवलंबून आहेत. व्यवसायावर दुग्धव्यवसाय हा जोडधंदा म्हणून जरी ओळखला जात असला तरी ग्रामीण भागात हा व्यवसाय सध्या प्रमुख व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. म्हणून ग्रामीण भागात अनेक कंपन्या शेती क्षेत्रामध्ये खुप चांगलं काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे ज्ञान व शेतीचे उत्पादन देखील वाढताना दिसून येत आहे. परंतु दुग्धव्यवसायाची परिस्थिती जैसे थे असेच म्हणावे लागेल. कारण दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञान जोपर्यंत पशुपालकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत दूध उत्पादन वाढून दुग्ध व्यवसायाचा एकात्मिक खर्च कमी होणार नाही आणि तोपर्यंत पशुपालकांना दुग्धव्यवसाय देखील परवडणार नाही.

धेनू अँपची मुख्य उद्दिष्टे

शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायात साक्षर करणे.
दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.
शेतकऱ्यांच्या डिजिटल पद्धतीने अडचणी सोडवणे.
शेतकऱ्यांचे शाश्वत दुधउत्पादन वाढवणे.
शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे. याच अनुषंगाने धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने पशुपालकांच्या गरजा लक्षात घेऊन गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या शिवाय दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची बँक असणारे धेनू अँप शेतकरी बांधवांसाठी व पशुपालक विकसित करून त्यामध्ये मंच (प्रश्न उत्तरे), पशुज्ञान, पशुबाजार आणि फीचर्ससह प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध करून दिले आहे. पशुव्यवस्थापन यांसारख्या विविध


माहिती ऑडिओ व व्हिडिओच्या स्वरूपात मोफत उपलब्ध

धेनू अँपच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना मुक्तसंचार गोठ्याचे फायदे काय आहेत, जनावरांचे तिन्ही ऋतुतील आजार व आहार व्यवस्थापन कसे करावे, सकस चाऱ्यासाठी कोणत्या वैरणी लावाव्यात, आधुनिक मुरघास तंत्रज्ञान काय आहे, जनावरांची वंशावळ व दूध उत्पादन कसे वाढवावे, आदर्श पशुपालक गोठ्यात कोणते तंत्रज्ञान वापरतात, निर्मळ दूध उत्पादन डिजिटली करावे, जनावरांच्या नोंदी ठेवाव्यात तसेच दुग्धव्यवसाय तोट्यात जाण्याची काय कारणे आहेत. याबाबत सर्व माहिती व तंत्रज्ञान ऑडिओ व व्हिडिओच्या स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिले आहे.

ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायाची पशुपालकांना सखोल माहिती नसल्याने जनावरांची खरेदी - विक्री करताना फसले किंवा फसवले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पारंपरिक किंवा आडाणी पद्धतीने दुग्धव्यवसाय केला तर या धावत्या युगात टिकणे खूप अवघड होईल. दुग्धव्यवसाय जरी सोपा आणि बक्कळ पैसा मिळवून देणारा व्यवसाय असला तरी त्यासाठी भरपूर भांडवल व काही काळाची प्रतीक्षा करावीच लागते.

दुग्धव्यवसायातून मिळवून प्रगती हमखास साधायची असेल तर कोणावरही अवलंबून न राहता स्वतः व्यवसायातील माहितीचा शिलेदार बनणे खूप आवश्यक आहे. दुग्धव्यवसायातील आधुनिक माहितीचा शिलेदार बनण्यासाठी शेतकऱ्यांना धेनूअॅप्लिकेशन लाख मोलाची मदत करेल हे नक्की ! धेनू अॅप हे भारतातील तसेच अमेरिकेतील तज्ञ मंडळींनी शेतकऱ्यांच्या गरजा व अडचणी लक्षात घेऊन त्यावर तोडगा निघावा व त्याच्या अडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने बनवले आहे.

लेखक : नितीन रा. पिसाळ प्रकल्प समन्वयक धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि, पुणे. पत्ता : धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, बी १०८, एलोरा शॉपी, सेक्टर -१, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे.

English Summary: Ginger Dhenu app for livestock development; Farmers are benefiting Published on: 15 January 2022, 09:53 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters