News

सध्या साखर कारखानदारी तोट्यात चालली आहे. कारखाने चालवणे जिकरीचे बनत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देताना देखील अनेक अडचणी येतात. असे असताना आता घोडगंगा कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्प मोठा आर्थिक संकटात असताना आता यातून बाहेर पडला आहे.

Updated on 13 June, 2022 1:52 PM IST

सध्या साखर कारखानदारी तोट्यात चालली आहे. कारखाने चालवणे जिकरीचे बनत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देताना देखील अनेक अडचणी येतात. असे असताना आता घोडगंगा कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्प मोठा आर्थिक संकटात असताना आता यातून बाहेर पडला आहे. आता मात्र कारखान्याचा डिस्टलरी व कोजन प्रकल्प नफ्यात असून, येत्या गाळप हंगामात कारखाना सुस्थितीत येईल, असा विश्‍वास कारखान्याचे अध्यक्ष व आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीच्या काळात शेतकरी सभासद व कामगार वर्गाने वेळोवेळी कारखान्याला सहकार्य केले आहे. कारखान्याच्या हितामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. लवकरच कामगारांना १२ टक्के पगार वाढ देणार आहे. यामुळे कामगारांना दिलासा मिळणार आहे. तसेच कारखान्यावर कोणत्याही वित्तीय संस्थांचे कर्ज थकीत नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पुढील काळात चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांना देखील चांगला दर मिळेल असेही ते म्हणाले. येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (VSI) सदस्यपदी व पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आमदार व कारखान्याचे अध्यक्ष ॲड. अशोक पवार यांचा घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आता डासांचे टेन्शन मिटले, बाजारात आला नवीन बल्ब, डास मारण्यासाठी ठरतोय वरदान

सध्या अनेक कारखाने हे आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे अनेक कारखाने हे शेतकऱ्यांचे पैसे देखील देऊ शकले नाहीत. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना मात्र काही कारखाने चांगल्या पद्धतीने देखील चालवले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे.

महत्वाच्या बातम्या;
कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश, पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली..
7 धावत्या घोड्यांचा फोटो करेल चमत्कार, श्रीमंत व्हायच असेल तर घरात हा फोटो लावाच
न्यूझीलंड सरकारचा निर्णय, गुरांनी ढेकर दिल्यावर मालकांना भरावा लागणार कर, कारणही आले समोर...

English Summary: Ghodganga Kojan, distillery project is profitable, farmers will benefit
Published on: 13 June 2022, 01:52 IST