मुंबई: भाजी मार्केटमधील वाढलेल्या भाज्याचे दर पाहून गृहिणींना भोवळ येत असते. या वाढलेल्या दरामुळे आपल्या घरातील बजेट सावरताना महिलांची दमछाक होत असते. विशेष म्हणजे महागाचा भाजीपाला घेऊनही आपल्या शरीराला पुरक जीवनसत्व मिळत नाहीत. अधिक नफा कमविण्यासाठी उत्पादक मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत असतात. यामुळे पाले भाज्यांमधील जीवनसत्वे कमी होतात. मोठे पैसे देऊनही आपण निकृष्ट प्रकारच्या भाज्या खात असतो. बाजारात पौष्टिक आणि सेंद्रिय भाजीपाला मिळत नाही. घाबरू नका आता तुम्हीही सेंद्रिय भाजीपाला पिकवू शकता. या लेखात तुम्ही जाणून घेणार आहात की, अगदी मोजक्या पैशात तुम्ही पौष्टिक पालेभाज्या कशा पिकवता येतील.
पिकवा पौष्टिक भाज्या
मार्च-एप्रिलपासून खरीप हंगाम सुरू होत आहे. या हंगामात भाजीपाल्यांचे पीक घेतले जाते. अशात तुम्ही तुमच्या किचन गार्डन किंवा परसबागेत भाज्या पिकवू शकता आणि पौष्टिक आहार मिळवू शकता. खरीप हंगामात तुम्ही कारली, वांगे, गवार, भेंडी, टमाटे, भोपळा, मिर्ची, काकडी, यासारख्या भाज्यांचे पीक तुम्ही घेऊ शकतात. यासह अनेक नर्सरीमध्ये वेली असलेल्या भाज्यांचे रोप मिळतात. बियांऐवजी तुम्ही तेथून सहजपणे रोपे घेऊ शकता. या रोपांच्या बिया तुम्हाला कृषी बाजाराजवळ बि-बियाणे विक्रेत्यांकडे मिळतील. घरी बाग पिकविण्यासाठी लागणाऱ्या बियांची बियाणे विक्रेत वेगळ्या पद्धतीने पॅकिग करतात. आपल्या परसबागेत पिकवलेल्या भाज्या खाल्याने तुम्ही आरोग्यी राहाल आणि तुमचा पैसाही वाचेल. नाशिक शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर बाग पिकवली आहे. तुम्ही आपल्या घराच्या छतावर बाग पिकवून पौष्टिक आहार मिळवा.
Share your comments