लस घ्या, जास्त व्याज मिळवा-सेंट्रल बँक ऑफ इंडियाची योजना

13 April 2021 11:41 PM By: KJ Maharashtra
सेंट्रल बँकेची लसीकरणासाठी अनोखी योजना

सेंट्रल बँकेची लसीकरणासाठी अनोखी योजना

गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे.  ही वाढलेली रुग्ण संख्या पाहता लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. या लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने एक योजना आणली आहे.

या योजनेअंतर्गत ज्या लोकांनी लगेच घेतली आहे, त्यांना त्यांच्या एफडी वर जास्त व्याज मिळेल.नेमकी ही योजना काय आहे? त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 

 काय आहे ही योजना?

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया फिक्स डिपॉझिट स्कीम लॉन्च केली आहे. या योजनेचे नाव इम्युन  इंडिया डिपॉझिट असा ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत फिक्स डिपॉझिट केल्यावर ग्राहकांना चालू व्याजदरावर 0.25टक्के जास्त लाभ मिळेल. या योजनेचा फायदा हा कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीलाच होईल. अशा व्यक्तींना चालू व्याजदरापेक्षा 0.25 टक्के जास्त व्याज मिळेल.तसेच कोरोना लस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 0. 50 टक्के जास्त व्याज दिले जाईल.

 

 बँकेने का सोशल मीडिया मध्ये केलेल्या पोस्ट द्वारे या योजना बद्दल माहिती दिली आहे. योजना बँकेने ठराविक काळासाठी  लॉन्च केली आहे.  या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड हा 1111 दिवसांचा आहे.योजना ठराविक काळासाठी लॉंच करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी योजना लॉन्च केली आहे.

Central Bank of India vaccinated सेंट्रल बँक ऑफ इंडिया
English Summary: Get vaccinated, get higher interest - Central Bank of India's plan

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.