शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ची स्थापना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास व्हावा तसेच मराठा समाजातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी केली आहे. शासनाने या योजनेच्या माध्यमातून व्याज परतावा योजना अमलात आणली आहे.
.या महामंडळाच्या अंतर्गत चार वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील 3946 युवक आणि युवतींना 313 कोटींचे कर्ज मिळाले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा तसेच लागणारे कागदपत्र याबद्दल माहितीघेऊ.
महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी कसा कराल अर्ज?
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर मराठा आणि खुल्या प्रवर्गातील युवकांनी www.udyog.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी व ऑनलाईन अर्ज करावा.
लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- आयटीआर म्हणजेच कर भरल्याची विवरणपत्र
- कर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेचे कर्ज मंजुरी पत्र
- कर्ज खाते उतारा
- ईएमआय चार्ट
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- उद्योग आधार
- बचत खात्याचा धनादेश
- व्यवसायाचे छायाचित्र
कोल्हापूर जिल्ह्यात मिळाला 20 कोटींचा व्याज परतावा….
संबंधित युवक आणि युवतींना कर्ज मिळाल्यानंतर दर महिन्याला कर्जाचा हप्ता आणि त्यावरचे व्याज भरायचे. त्यानंतर या संबंधीचे ऑनलाईन स्टेटमेंट महामंडळाला सादर केल्यानंतर संबंधितांच्या बचत खात्यामध्ये व्याजाचा परतावा जमा केला जातो.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने कोल्हापूर जिल्ह्यात 20 कोटी 16 लाख 80 हजार 392 रुपये इतका व्याजाचा परतावा दिला आहे.(स्त्रोत-लोकमत)
Share your comments