तुळशीच्या पिकातून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

22 April 2020 01:47 PM


तुळशी सर्वात पवित्र वनस्पती असून  पुजा-अर्चासाठी तुळसीच्या पानांचा उपयोगही होत  असतो.  धार्मिक कामांबरोबर तुळसीमध्ये औषधी गुण असल्याने तुळशीचा मान अधिक आहे.  एक औषधी वनस्पती म्हणून तुळशीची एक वेगळीच जागा आहे.  इतकेच काय प्राणवायू देण्यासाठी ही तुळशी महत्त्वाची भूमिका निभावते.  सर्वाधिक ऑक्सिजन सोडणाऱ्या वनस्पतींपैकी तुळशी एक आहे.  ऑक्सीजन, औषध देणारी वनस्पती आपल्याला पैसाही देते. हो, आपण जे वाचलं ते बरोबरच वाचलं. तुळशीची शेती केली तर आपल्याला चांगला फायदा नक्कीच होईल.

सौदर्य प्रसाधने आणि औषध बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये तुळशीची मोठी मागणी आहे.  उज्जैनमधील एका शेतकऱ्यांने आपल्या १० बिघ्या जमिनीत १० किलो बियांची पेरणी केली.  यासाठी त्यांना १५ हजार रुपयांची खर्च आला.  त्यातून त्यांना मिळालेले उत्पन्न ऐकून तुम्हाला नक्की आर्श्चयाचा धक्का बसेल. १५ हजार रुपये खर्च लागलेल्या शेतीतून त्यांनी तब्बल ३ लाख रुपयांचा नफा कमावला.  विशेष म्हणजे फक्त तीन महिन्यात त्यांनी ही कमाई केली.  जर तुम्ही एका बिघ्यामध्ये शेती करत आहात तर आपल्याला साधरण १५ रुपयांचा खर्च येईल, आणि नफा मात्र अफाट.

  • कशी करावी तुळशीची शेती 

जुलै महिना हा तुळशीच्या लागवडीसाठी योग्य काळ असतो.  तुळशीची रोपे साधरण ४५ बाय ४५ सेंटीमीटरच्या अंतराने लावली पाहिजेत.  तर RRLOC 12 RRLOC च्या १४ वाणाच्या रोपांना ५० बाय ५० सेंटीमीटरच्या अंतरावर लावले पाहिजे.  रोपं लावल्यानंतर त्यांना थोडं पाणी द्यावे.  एका आठवड्यात कमीत कमी एकदा तरी पाणी द्यावे.  जेव्हा या पिकाची कापणी करायची असेल तर साधरण १० दिवसांपुर्वीच पाणी देणे बंद करावे.

  • कापणी कधी होते

जेव्हा तुळशीचे पाने मोठी होतात तेव्हाच याची कापणी होत असते.  याची योग्य वेळी कापणी करणं आवश्यक असतं.  जर कापणी योग्य वेळी नाही झाली तर याला फुले येऊ लागतात.  फुले (मंजुळा) आल्यानंतर त्यातील तेलाचे प्रमाण कमी होत जाते.  त्यामुळे मंजुळा येण्याआधीच याचे पाने तोडली पाहिजेत.

  • तुळशीच्या शेतीला किती येतो खर्च

जर आपण एका बिघ्यात तुळशीची शेती करणार असू तर त्यासाठी आपल्याला एक किलो तुळशींच्या बियांची गरज भासते.  बाजारात याची किंमत १५ हजार रुपये आहे.  यासह आपल्याला ३ ते ५ हजार रुपयाचे खत लागेल.  या पिकाच्या सिंचनासाठी थोडा पैसा लागेल.  एका हंगामात २ क्किंटल पर्यंत या पिकाचे उत्पन्न होत असते.  बाजारात याला साधरण ३० ते ४० हजार रुपये प्रति क्किंटलचा भाव मिळतो.

  • कशी करणार विक्री

बाजारात आडत्यांच्या मदतीने आपण यांची विक्री करु शकता.  किंवा आपण थेट याच्या खरेदी करणाऱ्यांना भेटू शकता.  किंवा कॉन्ट्रेक्ट फॉर्मिंग (Contract Farming) करण्यास सांगणाऱ्या औषध कंपन्या किंवा एजन्सीला तुम्ही आपला माल विकू शकता.

Tulsi farming Tulsi cultivation How to cultivate tulsi Cultivation of tulsi तुळशीची शेती कशी करावी तुळशीची शेती तुळशीच्या शेतीतूुन लाखो रुपयांचा फायदा
English Summary: Get millions of rupees from Tulsi farming

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.