ज्वारी हे महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये खरीप पेक्षा रब्बी हंगामात ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
ज्वारीचा उपयोग धान्य म्हणून तर होतोचपरंतु ज्वारी पासून मिळणारा कडबा हा जनावरांसाठी चारा म्हणून खूपच उपयुक्त आहे. परंतु मागील काही वर्षांपासून ज्वारीच्या भावा मध्ये झालेली घसरण व त्यादृष्टीने ज्वारी पिकवण्यासाठी लागणाऱ्या कष्ट आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्वारीच्या लागवड क्षेत्रात घट झाली. परंतु ज्वारी लागवड क्षेत्राचा विचार केला तर खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा मध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. यावर्षी विचार केला तर खानदेश मध्ये आणि विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये बऱ्या प्रमाणात ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. एकटा विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर ज्वारीचा पेरा करण्यात आला आहे. परंतु प्रश्न असा आहे कि एवढ्या प्रमाणात लागवड क्षेत्रात घट झाली आहे परंतु ज्वारीला चांगला भाव मिळेल का तसेच ज्वारीच्या कडब्याला देखील भाव कसा असेल याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
नक्की वाचा:सोनं लवकरच दराचा रेकॉर्ड गाठण्याची भीती? शुक्रवारी सोनं महागले
शेतकऱ्यांना जास्त दराची अपेक्षा
मराठवाडा,खानदेश आणि विदर्भातील काही भागातील मुख्य पीक असलेल्या ज्वारी लागवड मध्ये घट होत आहे. ज्वारीचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कारण ते शरीरासाठी देखील उपयुक्त आहे. परंतु लागवड क्षेत्रात घट झाल्यामुळे मागणीच्या मानाने ज्वारीचा पुरवठा होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागणीच्या मानाने ज्वारीचा पुरवठा जर घटला तर ज्वारीच्या भावात नक्कीच वाढ होण्याचा अंदाज आहे. एवढेच नाही तर ज्वारीच्या कडब्याच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र घटले यामुळे याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होईल. कारण मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे ज्वारी उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला.
नक्की वाचा:मेंढीपालन साठी लवकरच येणार पशुधन विमा योजना आणि सोडवला जाईल मेंढीचराईचा प्रश्न
परंतु विदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनीज्वारी लागवडीचा प्रयोग केला आहे.त्यामुळे या उत्पादन घटीचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना मिळू शकतो. जर टप्प्याटप्प्याने आणि बाजारपेठेचा अभ्यास करून ज्वारी विक्रीला आणले तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्या ज्वारीला 2000 ते 2800 पर्यंत भाव आहे.
Share your comments