पशुपालन हा शेतीचा एक प्रमुख जोडव्यवसाय आहे, राज्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक तसेच भूमिहीन शेतकरी पशुपालन करतात, आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात. पशुपालक शेतकरी पशुपालनातून प्राप्त होणारे दुध, शेणखत, मूत्रची सलरी अशा इत्यादी उत्पादनाची विक्री करतात आणि चांगली कमाई करतात. पशुपालनाला आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी म्हणुन शासन देखील प्रयत्न करीत असते. दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी शासनदरबारीं अनेक योजना राबविल्या जातात
ह्याच कडीत आता शासनाने नव्याने गाई-म्हशी अनुदानावर पशुपालकांना वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी यांना उत्पन्नाचा एक नवा पर्याय उपलब्ध व्हावा व त्यांना शेतीसमवेत पशुपालनातून देखील कमाई व्हावी हे धोरण डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाने हि कल्याणकारी योजना सुरु केली आहे. पण हि योजना या चालू आर्थिक वर्षासाठी काही जिल्ह्यात राबविण्यात येणार नाही आहे, उर्वरित जिल्ह्यात हि कल्याणकारी योजना लवकरच राबविली जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
असे मिळणार अनुदान
महाराष्ट्र शासनाकडून दोन दुधाळ गाई किंवा म्हशी घेण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. या योजनेद्वारे अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळेल, तर स्वहिस्सा अनुसूचित जातीसाठी 25 टक्के अनुदान शासनाकडून भेटणार आहे. तसेच सर्वसाधारण शासकीय अनुदान हे 50 टक्के, तर स्वहिस्सा सर्वसाधारण अनुदान हे देखील 50 टक्के असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवन्यात आले आहेत. ह्या योजनेसाठी लाभार्थी निवडणे देखील सुरु करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागितले जात असल्याने ह्या योजनेची पारदर्शकता स्पष्ट होते असे मत देखील व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्या गाई-म्हशीवर आहे अनुदान
ह्या योजनेद्वारे जर्शी, मुऱ्हा, जाफराबादी ह्या संकरीत जातीच्या गाईसाठी अनुदान दिले जाणार आहे, तसेच गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या देशी गाईसाठी शासनाकडून अनुदान भेटणार आहे. ह्या कल्याणकारी योजनेसाठी अर्ज करण्याची चार डिसेंबर रोजी झाली तर 18 डिसेंबर पर्यंत अर्ज हे मागवले जाणार आहेत.
कोना-कोनाला मिळेल लाभ
ह्या योजनेचा लाभ महिला बचतगट, वैयक्तिक, तसेच अल्पभूधारक शेतकरी यांना मिळणार आहे. शिवाय ह्या योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींना सुद्धा मिळणार आहे, त्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी असणे बंधनकारक आहे.
योजनेसाठी आवश्यक दस्ताऐवज
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे फोटो, अर्जदार व्यक्तीचे आधार, रेशन कार्ड, सात-बारा, नमुना नंबर 8 अ, अपत्य दाखला, जातीच्या दाखल्याची प्रत, रहिवासी दाखला, बिपीएल असल्याचा दाखला, बँक पासबुक, तसेच शैक्षणिक कागदपत्रे लागणार आहेत. https//ah.mahabms.com शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ह्या अधिकृत वेबसाईटवर अर्जदाराला अर्ज करता येणार आहे.
संदर्भ-टीव्ही9
Share your comments