1. बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांना मिळणार मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा लाभ

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करून या योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे सात जुलै 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
irrigation system

irrigation system

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करून या योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे सात जुलै 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

त्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय जाहीर करून जळगाव जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे लाभ मिळणार आहेत.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे स्वरूप

 योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व त्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राबविण्यात येते.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याच्या प्लास्टिक व अन्य साहित्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा 75 हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम अनुदान म्हणूनमिळणार आहे तसेच केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत देण्यात येणारे अनुदानासराज्यामार्फत पूरक अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

इतकेच नाही तर हरितगृह आणि शेडनेट हाऊस उभारणीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये देखील मिळणार आहे.

 या योजने अंतर्गत समाविष्ट तालुके

चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा,पारोळा,जळगाव, मुक्ताईनगर आणि जामनेर या सात तालुक्यांचा अगोदरच या योजनेत  समावेश होता. आता नवीन मान्यता दिलेले तालुके  एरंडोल, धरणगाव,भुसावळ, रावेर बोदवड,यावल, चोपडा,भडगाव या नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.( संदर्भ-सकाळ)

English Summary: get benifit to mukhyamantri shaswat sinchan yojana to 15 taluka ina jalgaon district Published on: 22 November 2021, 11:30 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters