मुंबई : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी सरकार विविध योजना आणत आहे. यासह बँकांही निरनिराळ्या ऑफर शेतकऱ्यांसाठी आणत असते, जेणेकरुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत राहिल. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कृषी क्षेत्र मोठी भुमिका निभवणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी बँकां कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देत असते. पण यासाठी शेतकऱ्यांना अनेक गोष्टींची पुर्तता करावी लागते. त्यात अनेकांना कर्ज मिळत नसते. पण आता शेतकऱ्यांची ही समस्या लवकरच सुटणार आहेत. कोणत्याही कागदाची पुर्तता न करता शेतकऱ्यांना काही मिनिटात कर्ज मिळणार आहे.
हो, ही सुविधा आणली आहे, नवी लेंडिग कंपनीने या कंपनीकडून आपण ५ लाखापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. काय आहे या नवी लेंडिग कंपनीची स्कीम याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कोरोनाच्या भितीमुळे बहुतांश नागरीक सध्या घराबाहेर पडण्यास धजावत नाही. तसेच बँका लॉकडाऊन आणि सोशल डिस्टसिंग नियमांमुळे केवळ मुलभूत सेवाच ग्राहकांना पुरवत आहेत. यामुळे ग्राहकांची ही समस्या लक्षात घेत हे एपच्या माध्यामातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याचे काम या कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. या एपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्वरीत कर्ज मिळते. नवी लेडिंग हे एक एप असून यातून आपण कर्ज घेऊ शकणार आहोत. साधरण ३६ महिन्यांच्या मुदतीसाठी पाच लाखापर्यंतचे कर्ज आपण घेऊ शकतो.
या कंपनीकडून कर्ज घेताना आपल्याला कोणताच कागद आपल्याला द्यावा लागत नाही. कर्ज पुर्णतः डिजीटल आणि संपर्कविरहीत प्रक्रियेद्वारे तत्काळ वितरित केले जाते. स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाशी जवळीक साधणाऱ्या मध्यमवर्गीय उत्पन्न गटातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या नवी अॅपद्वारे कर्ज दिले जाते. दरम्यान या नवी (Navi) एप जून महिन्यापासून कार्यान्वित झाले असून या कर्जवितरण अॅपला संपुर्ण महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद शहरातील ग्राहकांनी या अॅपच्या माध्यमातून तत्काळ पेपरलेस कर्ज घेतले आहे.
कसे घेणार हे एपमधून कर्ज -
हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. या एपच्या माध्यमातून ग्राहक त्यांची पात्रता तपासून पाहू शकतात आणि त्यानंतरच कर्जाची रक्कम आणि दरमहा हप्ताची निवड करु शकतात. यासाठी ग्राहकांना पॅन आणि आधार क्रमांक दाखल करावे लागेल. त्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यात अवघ्या मिनिटभरात कर्जाची रक्कम जमा होते. ही संपुर्ण प्रक्रिया पुर्णतः कागदविरहीत असून त्यासाठी पगाराची स्लीप अथवा बँक खात्याच्या व्यवहारांची माहितीचे कागदपत्र अपलोड करण्याची कोणतीही गरज भासत नाही.
Share your comments