या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रमध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. त्यानंतर शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिकची मदत जाहीर केली व आता ती हळूहळू वितरित करण्यात येत आहे.
या सगळ्या परिस्थितीत नांदेड जिल्हा देखील अपवाद नव्हता. जर आपण नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी जवळजवळ साडेसात लाख हेक्टरच्या आसपास खरीप व बागायती तसेच विविध प्रकारच्या फळपिकांचे 34 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.
या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस झाला होता व पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
नक्की वाचा:कांद्यापाठोपाठ लसणाच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता; पहा आजचे दर
जर आपण जिरायती शेतीचा विचार केला तर या मधील सोयाबीन, कपाशी तसेच ज्वारी, तुर,उडीद आणि मूग सारखे जवळ जवळ पाच लाख 27 हजार 141 हेक्टरवरील पिकांसह जवळजवळ 314 हेक्टरवरील बागायती व 66 हेक्टरवरील फळपिके असे एकूण पाच लाख 27 हजारपेक्षा जास्त हेक्टर पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.
शासनाकडून इतकी मिळाली भरपाई
शेवटी या नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या नवीन निकषानुसार नांदेड जिल्ह्यासाठी 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयांची मागणी शासनाकडे केली होती व
त्या मागणीनुसार 717 कोटी 88 लाख 91 हजार सहाशे रुपयांचा निधी बुधवारी नांदेड जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला व हा प्राप्त निधी लगेच सर्वच 16 तालुक्यांना वितरित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
Share your comments