शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबवून या योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
याचाच एक भाग म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित राष्ट्रीय पशु संवर्धन योजना 2021-22 या वर्षापासून राबवण्यात येत आहे.
राष्ट्रीय पशु संवर्धन योजना 2021-22
या योजनेद्वारे शेळी, मेंढी पालन, कुकुट पालन, वराह पालन,पशुखाद्य वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती,टी एम आर,फॉडर ब्लॉक निर्मितीतसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुदान हे मर्यादित रकमेपर्यंत मिळेल परंतु शेतकऱ्यांना उरलेली रक्कम बँकांकडून कर्ज म्हणून घ्यावी लागणार आहे.
व्यवसायासाठी अनुदान मर्यादा
- शेळी मेंढी पालन- पन्नास लाख रुपये
- कुक्कुटपालन- 25 लाख रुपये
- वराह पालन- 30 लाख रुपये
- पशुखाद्य व वैरण विकासासाठी 50 लाख रुपये
असा घ्या योजनेचा लाभ
व्यक्तिगत व्यावसाईक,स्वयं सहाय्यता बचत गट,शेतकरी उत्पादक संस्था,सहकारी जोखीम गट,सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रुप यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून अर्जासोबत प्रोजेक्ट रिपोर्ट, पॅन कार्ड,आधार कार्ड, रहिवासी पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र किंवा वीज बिलाची प्रत) छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक हे महत्त्वाचे कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती आणि मार्गदर्शक सूचना साठी http://ahd.maharashtra.gov.inकिंवा http://www.nlm.udyamimitra.inया संकेतस्थळाला भेट द्यावी. पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.
Share your comments