भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भौगोलिक संकेतांक

Saturday, 30 March 2019 08:07 AM


नवी दिल्ली:
भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग चालना आणि अंतर्गत व्यापार विभागाने भौगोलिक संकेतांक जारी केले आहेत.

कुर्ग अरेबिका (जि. कोडागू, कर्नाटक), वायनाड रोबस्टा (जि. वायनाड, केरळ), चिकमगळूर अरेबिका (जि. चिकमगळूर, कर्नाटक), अराकू व्हॅली अरेबिका (आंध्र व ओडीशाचा डोंगराळ भाग) आणि बाबाबुदनगिरीज अरेबिका (चिकमगळूर) या कॉफीच्या पाच जातींना भौगोलिक संकेतांक मिळाला आहे. भारतात बहुतांश करुन दक्षिणेकडच्या राज्यात कॉफीचे उत्पादन होते. सुमारे 4.54 लाख हेक्टरवर 3.66 लाख शेतकरी कॉफीचे उत्पादन घेतात.

भौगोलिक संकेतांक प्रमाणपत्रामुळे ओळख आणि संरक्षण मिळते. यामुळे विशिष्ट भागात तयार होणाऱ्या विशिष्ट जातीच्या कॉफीच्या गुणवत्ता, राखण्याकरिता कॉफी उत्पादकांना गुंतवणूक करण्यात येईल. यामुळे कॉफी उत्पादकांना जास्तीत जास्त किंमत मिळण्याबरोबरच भारतीय कॉफीला जागतिक स्तरावर अधिक मान्यता मिळेल.

indian coffee भारतीय कॉफी भौगोलिक संकेतांक Geographical Index GI कुर्ग अरेबिका वायनाड रोबस्टा चिकमगळूर अरेबिका अराकू व्हॅली अरेबिका बाबाबुदनगिरीज अरेबिका
English Summary: Geographical Index for five varieties of Indian coffee

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.