1. बातम्या

भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भौगोलिक संकेतांक

नवी दिल्ली: भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग चालना आणि अंतर्गत व्यापार विभागाने भौगोलिक संकेतांक जारी केले आहेत.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग चालना आणि अंतर्गत व्यापार विभागाने भौगोलिक संकेतांक जारी केले आहेत.

कुर्ग अरेबिका (जि. कोडागू, कर्नाटक), वायनाड रोबस्टा (जि. वायनाड, केरळ), चिकमगळूर अरेबिका (जि. चिकमगळूर, कर्नाटक), अराकू व्हॅली अरेबिका (आंध्र व ओडीशाचा डोंगराळ भाग) आणि बाबाबुदनगिरीज अरेबिका (चिकमगळूर) या कॉफीच्या पाच जातींना भौगोलिक संकेतांक मिळाला आहे. भारतात बहुतांश करुन दक्षिणेकडच्या राज्यात कॉफीचे उत्पादन होते. सुमारे 4.54 लाख हेक्टरवर 3.66 लाख शेतकरी कॉफीचे उत्पादन घेतात.

भौगोलिक संकेतांक प्रमाणपत्रामुळे ओळख आणि संरक्षण मिळते. यामुळे विशिष्ट भागात तयार होणाऱ्या विशिष्ट जातीच्या कॉफीच्या गुणवत्ता, राखण्याकरिता कॉफी उत्पादकांना गुंतवणूक करण्यात येईल. यामुळे कॉफी उत्पादकांना जास्तीत जास्त किंमत मिळण्याबरोबरच भारतीय कॉफीला जागतिक स्तरावर अधिक मान्यता मिळेल.

English Summary: Geographical Index for five varieties of Indian coffee Published on: 30 March 2019, 08:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters