2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारची वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट एक शेतकऱ्यांसाठी असलेली योजना आहे
या योजनेचा उद्देश आहे की, एखाद्या विशिष्ट जिल्ह्यासाठी या पिकाच्या लागवडीला व त्या संबंधित पिकाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाते. केंद्र सरकारची वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारची ही योजना महाराष्ट्रातही राबवली जात असून या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यात पेरू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.
वन डिस्ट्रिक वन प्रोडक्ट या योजनेमुळे संबंधित जिल्ह्याला विशिष्ट पिकांमुळे ओळख निर्माण होऊन या पिकाचा निर्यातीसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल व त्यासोबतच संबंधित पिकाला जास्त मागणी येईल. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. केंद्रसरकारच्या मिनिस्ट्रीऑफ फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजनेमहाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यासाठी वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या योजनेअंतर्गत पेरू पिकाची निवड केली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पेरू लागवडीला प्रोत्साहन मिळून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र मध्ये विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यासाठी पेरू पिकाची झालेली निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात पेरू लागवडीला चालना मिळेल व महाराष्ट्र पेरू लागवड की एक विशिष्ट स्थान निर्माण करेल. पेरू हे फळ पिकांमधील महत्त्वाचे फळ पीक असून या पिकाची शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
Share your comments