अहमदनगर
अवघ्या महाराष्ट्राच्या तरुणांना घायाळ करणारी गौतमी पाटील अवघ्या काही दिवसात तिच्या नृत्यामुळे सर्वत्र ओळखू जाऊ लागली. 'सबसे कातील, गौतमी पाटील'असं म्हणत राज्यभरात तिचा तरुण चाहता वर्ग झाला आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुणाई प्रचंड गर्दी करत असते. याचदरम्यान गौतमी पाटीलच्या अहमदनगर येथिल एका कार्यक्रमात दगडफेक झाल्याची घटना घटली आहे. त्यामुळे गौतमी पाटील आयोजकांना तंबी दिली आहे.
अहमदनगरच्या नागापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवं नागपूरचे सरपंच यांनी कुटुंबातील सदस्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. तरुणांनी इतका गोंधळ घातला की, त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली.
या झालेल्या दगडफेकीत एक महिला जखमी झाली. त्यामुळे गौतमी अर्धातच कार्यक्रम सोडावा लागला. तसंच यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही, तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशाराही गौतमी पाटीलने यावेळी दिला. "गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही," अशी स्पष्टच भूमिका गौतमी पाटीलने यावेळी मांडली आहे.
पुढे गौतमी म्हणाली की, "माझा कार्यक्रमाला तरुणाईची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेकांदा पाठिमागे असलेल्या प्रेक्षकांना माझा कार्यक्रम पाहता येत नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होती. आताही तेच झालं. त्यामुळे मी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसंच यापुढे प्रत्येक आयोजकाला मला सांगायचं आहे की, बंदोबस्त व्यवस्थित करा. माझ्या कार्यक्रमात जर नेहमीच गोंधळ होणार असेल तर मी इथून पुढे कार्यक्रम बंद करते, आणि खरचं करेल".
दरम्यान, गौतमी पाटील अश्लील हावभाव करते असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. पण गौतमीने आपल्या कलेच्या जोरावर अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. तसंच तिची नृत्याची क्रेझ आजही कायम आहे.
Share your comments