1. बातम्या

गॅस सिलेंडरचा उडाला भडका! गॅसच्या सिलेंडर मध्ये तब्बल 50 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांनी जगावं कसं?मोठा प्रश्न

सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल असो की डिझेल, साखर असो की खाद्यतेल त्यातच गॅस सिलेंडर म्हणजे सर्वसामान्य माणसाची सुखाने जगण्याची कल्पनाच हिरावून नेण्यासारखी ही महागाई आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gas cyllinder price hike to 50 rupees

gas cyllinder price hike to 50 rupees

सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल असो की डिझेल, साखर असो की खाद्यतेल त्यातच गॅस सिलेंडर म्हणजे सर्वसामान्य माणसाची सुखाने जगण्याची कल्पनाच हिरावून नेण्यासारखी ही महागाई आहे.

आता गॅस सिलेंडरच्याघरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्यासिलेंडर म्हणजे तब्बल पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे आता नवीनवाढलेल्या किमती नुसारगॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना 949.50रुपये द्यावे लागणार आहे.5 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता 349 तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2003.50 रुपये झाली आहे.गेल्या सहा ऑक्टोबर रोजीगॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले होते.

नक्की वाचा:10 वी उत्तीर्ण आहात आणि भारतीय सैन्य दलात जाण्याची अफाट इच्छा आहे! तर भारतीय सैन्यात आहे नोकरीची सुवर्णसंधी

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील वाढ

 पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने 22मार्च म्हणजेच आज पासून सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरात 85 पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 137 दिवसानंतर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेट्रोल 110 रुपये 14 पैसे लिटर वरून 110 रुपये 99 पैसे लिटर तर डिझेल 94 रुपये 30 पैसे प्रति लिटर वरून 95 रुपये 16 पैशांवर आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून आठवडा पूर्ण होत नाही तोपर्यंत केंद्रानेही इंधन दरवाढ लागू केली आहे. 

त्यामुळे आता  पेट्रोल आणि डिझेलची संबंधित व्यवसायांवर देखील याचा परिणाम होणार असून ट्रान्सपोर्ट सारख्या व्यवसाय देखील आता महागणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर याचा परिणाम होऊन जीवनावश्यक वस्तू देखील महाग होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची दाट शक्यता आहे.

English Summary: gas cyllinder price hike to fifty rupees and petro disel price hike from today Published on: 22 March 2022, 10:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters