1. बातम्या

Gas Cylinder Subsidy: तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी किती मिळते? जाणून घ्या घरबसल्या..

आजही असंख्य घरात गॅस सिलिंडर वापरला जातो. सरकार दरवर्षी गॅसवर सबसिडी देते. मात्र अनेक लोकांना आपल्याला सबसिडी किती मिळते याविषयी माहिती नसते. त्यामुळे घरीबसून मोबाइलवर सबसिडी कशी पाहायची याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Gas Cylinder Subsidy

Gas Cylinder Subsidy

आजही असंख्य घरात गॅस सिलिंडर वापरला जातो. सरकार दरवर्षी गॅसवर सबसिडी (Gas Cylinder Subsidy) देते. मात्र अनेक लोकांना आपल्याला सबसिडी किती मिळते याविषयी माहिती नसते. त्यामुळे घरीबसून मोबाइलवर सबसिडी कशी पाहायची याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पंतप्रधान उज्ज्वला योजनातर्गंत (PM Ujjwala Yojana) लाभार्थींच्या बँक अकाउंटमध्ये प्रति सिलिंडर 200 रुपये जमा केले जातात. सबसिडीचा फायदा घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड एलपीजी कनेक्शन लिंक (LPG Connection) असायला हवं. पण अनेक ग्राहकांना हे माहितीच नसतं की या योजनेचा त्यांना लाभ मिळतो की नाही.

हे ही वाचा 
Rain Damage Crop: काय सांगता! पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान टळणार; फक्त 'या' पद्धतींचा वापर करा

 

अशावेळी तुम्ही ऑनलाइन यासंदर्भात माहिती मिळवू शकतात. ती कशी? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया..

या स्टेप्स फॉलो करा

1) स्टेटस चेक करण्यासाठी सगळ्या पहिले अधिकृत वेबसाइट http://mylpg.in/ वर जा.
2) LPG सर्विस प्रोवाइडरला निवडण्यासाठी 'ज्वाइन DBT' या ऑप्शनवर क्लिक करा.
3) जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर DBTL ऑप्शनवर क्लिक करा.
4) त्यानंतर LPG प्रोवाइडरच्या अधिकृत वेबलाइटवर क्लिक करा.
5) मग इथे एक तक्रार बॉक्स ओपन होणार, तिथे तुम्ही सबसिडी स्टेटस चेक करु शकता.
6) यानंतर तुम्ही PAHAL ऑप्शनवर क्लिक करा.
7) यानंतर एक डायलॉग बॉक्स उघडणार. त्यात तुम्ही आधार नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर भरा.
8) यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला एका भागी 17 नंबरचा LPG आईडी भरा.
9) यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येणार तो भरा.
10) आता तुम्ही एलपीजीच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन होणार.

हे ही वाचा 
Crops Diseases: फळबाग आणि भाजीपाला पिकांवर रोग; काय कराल उपाय? जाणून घ्या...

यानंतर सबसिडी अशी चेक करा

1) त्यानंतर याची लिंक तुमच्या मेल आइडीवर येणार त्यावर क्लिक करा. 
2) या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचं अकाउंट एक्टिवेट होणार.
3) पुढे पुन्हा http://mylpg.in अकाउंट पर लॉगिन करा.
4) यानंतर Booking History आणि Subsidy ऑप्शनवर क्लिक करा.
5) यानंतर तुम्हाला कळेल की सबसिडी मिळते आहे की नाही.

महत्वाच्या बातम्या
Horoscope: ऑगस्टमध्ये 'या' चार राशींचे भाग्य उजळणार; वाचा सविस्तर
Onion Rate: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या आजचा कांदा बाजारभाव...
Groundnut Cultivation: शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या 'या' वाणाची करा लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न

English Summary: Gas Cylinder Subsidy check home.. Published on: 04 August 2022, 09:55 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters