Gas News :
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती (LPG Gas Price) या २०० रुपयांनी कमी होणार आहेत. याबाबत घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे.
ओनम आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने महिलांना हे गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ७५ लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत, मात्र भारतात त्याचा परिणाम कमी आहे.
सरकारने १४ किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये २०० रुपये प्रति सिलिंडरची कपात जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजीवर २०० रुपये प्रति सिलिंडरची कपात करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी २०० रुपये अनुदान होते. तर आजपासून त्यावर २०० रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना ४०० रुपये अनुदान मिळणार आहे. ३३ कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर ७५ लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी ७६८० कोटी खर्च येणार आहे.
Share your comments