1. बातम्या

चक्क शेणाच्या बदल्यात गॅस सिलेंडर, काय आहे कारण? वाचा

आजकाल गॅस ची दर भरमसाठ वाढलेले आहेत. त्यामुळं बरेच लोक चुलीवर स्वयंपाक बनवत असतात. कारण बाजारामध्ये एका गॅस ची किंमत ही 850 रुपये एवढी आहे. अश्या काळात जर का तुम्हाला कोणी आणि भेटले आणि म्हणाले की तुम्ही आम्हाला शेणखत द्या आणि या मोबदल्यात आम्ही तुम्हाला गॅस देऊ. असे घडल्यास प्रत्येक लोकांना आनंद होईल. चक्क हा प्रकार घडला आहे भारतामधील एका विद्यापीठाने राबवला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Gas cylinder

Gas cylinder

आजकाल गॅस ची दर भरमसाठ वाढलेले आहेत. त्यामुळं बरेच लोक चुलीवर स्वयंपाक बनवत असतात. कारण बाजारामध्ये एका गॅस ची किंमत ही 850 रुपये एवढी आहे. अश्या काळात जर का तुम्हाला कोणी आणि भेटले आणि म्हणाले की तुम्ही आम्हाला शेणखत द्या आणि या मोबदल्यात आम्ही तुम्हाला गॅस देऊ. असे घडल्यास प्रत्येक लोकांना आनंद होईल. चक्क हा प्रकार घडला आहे भारतामधील एका विद्यापीठाने राबवला आहे.

जर का तुम्हाला अस कोनी म्हणलं तर तुम मुझे गोबर दो हम तुम्हे गॅस देंगे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. बहुतांश  गावाकडे शेणाचा उपयोग हा जास्तीत जास्त प्रमाणात शेतातील खतासाठी आणि इंधनासाठी केला जातो. मात्र जर का तुम्हाला कोणी  भेटलं आणि म्हणलं तुम्ही आम्हाला शेणखत द्या या  मोबदल्यात  आम्ही  तुम्हाला  गॅस देऊ. असे झाल्यावर   प्रत्येक   जणालाच आनंद होईल.भारतातील डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाने (समस्तीपूर पूसा) या विद्यापीठाने हा अनोखा प्रयोग राबवला आहे.या उपक्रमात गावातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून शेण घेऊन त्यांना गॅस सिलिंडर भरुन दिला जातो. या विद्यापीठाने ही योजना फक्त गावस्वरूपी स्तरावर म्हणजेच मधुबनी जिल्ह्यातील सुखेत गावात चालू केली आहे.

हेही वाचा:गुजरातमध्ये ड्रॅगन फ्रुट च नामांकरण तर महाराष्ट्र राज्यात ड्रॅगन ची कोणती स्तिथी आहे


येथील अनेक लोकांचा प्रतिसाद  पाहता ही  योजना  शेजारच्या  आणखी  गावांमध्ये सुरू  करण्याचाही विचार विद्यापीठाने केला आहे.प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाडी जाते. या साठी शेतकऱ्यांना 25 किलो शेणखत आणि घरातील कचरा द्यावा लागतो. या शिवाय गवत आणि जलफुटी सुद्धा द्यावी लागते. कारण या भागात पूर आल्यामुळे या भागात जलफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.हे विद्यापीठ 60 टक्के शेणखत आणि 40 टक्के वाया गेले ले पदार्थ यांचे मिश्रण करून कंपोस्ट तयार केलं जातं.  या गावात शेणापासून कमीत कमी 500 टन कंपोस्ट खत तयार करण्याची योजना आहे. परंतु, पहिल्या वेळेस फक्त 250 टन कंपोस्ट खत बनवण्याचं नियोजन विद्यापीठाने केले आहे.


या गावात स्मोकलेस रूरल सॅनिटायजेशन या प्रोग्राम च्या अंतर्गत विद्यापीठाने गावातील एकूण 28 कुटुंबांना गॅस सिलेंडर दिलेत. या गावात केवळ 104 कुटुंबं आहेत.त्यापैकी 54 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.या सर्व जणांचे मिळून 500 टन गांडुळ खत निर्माण होत आहे. यामुळे एका वर्षाला लाखो रुपयांची बचत होते. सोबतच शेतकऱ्यांना सेंद्रीय खत मिळून रोजगारही तयार होणार आहे. याशिवाय 5 वर्षानंतर विद्यापीठ हा प्रकल्प गावलाच दान देणार आहे.

English Summary: Gas cylinder instead of cow dung cake what's the reason? Read on Published on: 30 June 2021, 10:37 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters