Buldana News : बुलढाणा जिल्हा गांजाचा जिल्हा म्हणून ओळखू जावू लागला आहे. मागील आठवड्यात बुलढाण्यातून गांजाबाबत मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यात आता पुन्हा गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर ग्रामीण पोलिसांनी भालेगाव येथील शेतकरी सुभाष खरे यांच्या शेतातून गांजाची झाडे जप्त केली आहेत. या धाडीमध्ये चक्क पोलिसांनी १९ लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून शेतकऱ्याला अटक केली आहे.
या शेतकऱ्याने तुरीच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. तसंच शेतकऱ्याच्या घरातून तब्बल देखील गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकारातील तपास पुढे गेल्यानंतर लोणार, मोताळा आणि त्या पाठोपाठ आता मलकापूर तालुक्यातील भालेगावात देखील शेतात गांजाची शेतीच आढळून आली.
मागील आठवड्यात मोठी कारवाई
मागील काही दिवसांपूर्वी लोणार तालुक्यात पोलिसांनी गांजाबाबत मोठी कारवाई केली होती. लोणार तालुक्यात पोलिसांनी गांजाची शेती शोधून जवळपास दीड कोटी रुपयांचा गांजा जप्त करत मोठी कारवाई केली होती. त्यानंतर मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावात देखील अशीच एक कारवाई केली होती.
दरम्यान, जिल्ह्यात आता सातत्याने गांजाची शेती आढळून येत असल्याने आणि गांजा सापडत असल्याने जिल्ह्याची ओळख गांजा उत्पादक म्हणून होऊ लागली आहे. यामुळे पोलिसांनी प्रशासन देखील आता सतर्क झाले असून शोध मोहिम सुरु आहे.
Share your comments