![](https://kjmarathi.b-cdn.net/media/7885/onion-exprt-1-640.jpg)
केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारने निर्यातबंदी निर्णय तडकाफडकी घेतल्याने कांदा उत्पादक नाराज झाले आहेत. निर्यात बंद झाल्याने बाजारातील कांद्याचा कमी झाला आहे. शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कांदा उत्पादकांनी निर्यातबंदीच्या अध्यादेशाची अंतयात्रा काढून आपला निषेध नोंदवला.
मालेगाव तालुक्यात व शेजारी असलेल्या सटाणा तालुक्यात बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी आहेत. परंतु केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे मालेगाव जिल्हा नाशिक येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या कांदा निर्यात बंदीच्या अध्यादेशाची 21 तारखेला सोमवारी अंत्ययात्रा काढली.
मागील महिन्यामध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार आर्थिक फायदा मिळत होता. परंतु सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय यामुळे कांदा भाव मध्ये घट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदीचा निषेध करून त्याच्या अध्यादेशाची सोमवारी अंत्ययात्रा काढली. मालेगाव शहरातील सटाणा नाका भागातून या अंतयात्रेला सुरुवात करण्यात आली. सटाणा रस्ता ते 60 फुटी रस्त्यावरून हे अंतयात्रा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी शासनाच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या.
Share your comments