संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर सरकारने मदतीची घोषणा केली होती व त्यानुसार या नुकसानीच्या मदतीचा जीआर काढण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.याबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
नक्की वाचा:जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावरील फुलांचा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू
या जीआरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना जो काही प्रचलित दर आहे त्यापेक्षा जास्त रक्कम देण्यात येईल असे देखील नमूद करण्यात आल आहे.
देण्यात येणाऱ्या मदतीचे स्वरूप
आधी दोन हेक्टरच्या मर्यादेत सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर एवढी मदत देण्यात येत होती. जर बागायत पिकांचा विचार केला तर अशा पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टर मर्यादेमध्ये 27 हजार रुपये प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत.
या आधी बागायती पिकांसाठी दोन हेक्टर मर्यादा होती आणि मिळणारी मदत 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर होती. बहुवार्षिक पिकांचे नुकसान यासाठी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये 36 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम या आधी दोन हेक्टर मर्यादेत 18 हजार रुपये प्रति हेक्टर होते.
10 ऑगस्टला जी काही राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मोबदलापेक्षा दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व आता या निर्णयानंतर त्यासंबंधीचा जीआर काढण्यात आला आहे.
नक्की वाचा:Agri News: 'या'विद्यापीठाच्या तीन वाणांचा 'नॅशनल गॅझेट'मध्ये समावेश,वाचा याबद्दल माहिती
Share your comments