शेतकरी शेतात आपला माल पिकवत असतो. पण शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. हवे तशी बाजारपेठ मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा आर्थिक फायदा होत नाही. याच धर्तीवर काम करत शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या कृषी जागरण मराठीने शेतकऱ्यांना फॉर्मर द ब्रँड हे व्यासपीठ तयार केले आहे. या व्यासपीठाचा वापर करुन शेतकरी आपल्या शेतमालाची घेतलेल्या उत्पन्नाची , पिकांची ब्रँडिंग आणि व्यवस्थित मार्केटिंग करु शकतो. गेल्या महिन्यापुर्वी कृषी जागरणने राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या ब्रँडिंगसाठी फॉर्मर द ब्रँड या आपल्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून व्यासपीठ मिळवून दिले होते.
याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला आहे. कृषी जागरण मराठीच्या फेसबुक लाईव्हमधून आपल्या उत्पन्नाविषयी माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी आज परत कृषी जागरणने आयोजित केलेल्या फॉर्मर द ब्रँड मंथली महोत्सवात सहभाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या मालाची ब्रँडिग कशी केली, नवीन शेतकरी आपल्या शेतमालाची ब्रँडिग कशी करु शकतात याची माहिती दिली.
फॉर्मर द ब्रँड मंथली महोत्सव हा कार्यक्रम झुम या एपच्या माध्यामातून घेण्यात आला. या कार्यक्रमात कृषी जागरणचे संस्थापक एम. सी. डॉमिनीक उपस्थित होते त्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांची ओळख करुन देत या फॉर्मर द ब्रँड कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी गो-शाळा प्रयोगात यशस्वी झालेली सांगली जिल्ह्यातील सुहास प्रभाकर पाटील आणि नवनाथ मल्हारी कास्पेट यांनी यात सहभाग घेत शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची आणि ब्रँडिगची माहिती दिली. आपल्या गो- शाळेविषयी बोलतांना सुहास पाटील म्हणाले की, ते गेल्या २१ वर्षांपासून गो- शाळा चालवित आहेत. यांच्या गोशाळेचे नाव गोपाल नंदन गोशाळा आहे.
पाटील हे गाईच्या दुधापासून तूप, ताक, आणि गोमूत्र यापासून उत्पादने तयार करतात. यासह औषधेही तयार केली जातात. देशी गाईच्या दुधात औषधी गुणधर्म काय असतात, त्याचा फायदा कसा होतो याची माहिती आपण ग्राहकांना दिली तर आपण गो-शाळेत चांगली कमाई करु शकतो आपण ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करु शकतो. त्याचे हे मार्गदर्शन गो-शाळा चालवणारे , पशुपालन करणारे, दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे. तुप तुप म्हणून विक्री केली तर आपण गवळी म्हणून व्यवसाय करू पण जर तूप औषध असल्याचे सांगून त्याचे गुण सांगून त्याची विक्री केली तर आपण डॉक्टर म्हणून व्यावसाय करू आणि तीन हजार रुपायांचा दर आपल्या तुपाला मिळून देऊ असे पाटील म्हणाले. दरम्यान सुहास पाटील हे गो- शाळेचे प्रशिक्षण देखील देतात. ज्यांना या गो- शाळा सुरु करायची आहे ते हे प्रशिक्षण घेऊ शकतात.
या कार्यक्रमात सहभागी झालेले दुसरे शेतकरी नवनाथजी यांनी सिताफळाविषयी माहिती दिली. नवनाथजी यांनी सन २००१ साली एन एम एच वन गोल्डन नावाची सिताफळाची वरायटी शोधून काढली. जवळजवळ त्यांनी दहा वर्षे त्या प्रकारचा अभ्यास केला. व्हरायटीचा अभ्यास करत असताना त्यांना जाणवले की हा वाण इतरांपेक्षा उत्तम आहे म्हणून त्यांनी ती बाहेर द्यायला सुरुवात केली. लोकल जातींच्या सिताफळांचे एकरी उत्पादन साधारणतः एक लाख रुपये उत्पन्न मिळते. परंतु एन एच एम गोल्डन प्रकारच्या वाणाचे एकरी उत्पन्न पाच ते सहा लाख रुपये होते. लोकल जातींचे सीताफळ हे 40 ते 50 रुपये प्रति किलो या भावाने विकली जातात. परंतु एन एच एम वन गोल्डन जातीचे सीताफळ हे बाजारात दोनशे रुपये प्रति किलो दराने विकली जात असल्याचे नवनाथ यांनी सांगितले.
Share your comments