फळबाग पिकांचे नुकसान फक्त अवकाळी पाऊस तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे न्हवे तर प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सुद्धा झाले आहे. ठरलेल्या दराच्या निम्मे दर सुद्धा केळी ला भेटत नाही. एका बाजूला अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान तर दुसऱ्या बाजूला सतत वातावरणामध्ये होत असलेले बदल आणि इकडे दिवसेंदिवस घटत असलेले दर या दोन्ही संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी स्वयं केळीच्या बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. मागील काही दिवसात बागांवर करपा रोग पडल्याने बागा तोडून टाकल्या तर आता घटत असलेल्या दरामुळे बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.
काय आहे केळीच्या दराचे वास्तव?
शासनस्तरावर प्रत्येक फळांचे दर ठरविले जातात जे की केळी ला प्रति क्विंटल १ हजार रुपये असा दर ठरवला होता त्यामुळे चांगले उत्पन्न निघेल अशी अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना होती मात्र निसर्गाचा जसा लहरीपणा नडतो त्याचप्रमाणे शासनाचा लहरीपणा नडलेला आहे. मागील काही दिवसापासून केळी ला प्रति क्विंटल २००-३०० रुपये असा दर भेटत आहे त्यामुळे वर्षभर केळीच्या बागेची चांगल्या प्रकारे जोपासना करून ३०० रुपये दर कसा परवडेल असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. त्यात अजून वाहतुकीचा खर्च आणि काढणी चा खर्च त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर कुऱ्हाड चालवणे पसंद केले आहे.
खरेदीदार अन् व्यापाऱ्यांची खेळी...
वर्षभर केळीची जोपासना करून सुद्धा शेतकरी दर ठरवू शकत नाहीत तर बाजार समितीत याचे दर ठरले जातात ने की प्रति क्विंटल ला १ हजार रुपये असा भाव ठरला होता. परंतु आता कोरोना असल्याने उठाव नाही असे कारण सांगत खरेदीदार आणि व्यापारी वर्ग दर पाडत आहेत असा आरोप पाचोरा तालुक्यातील शेतकरी संघटनेने केला आहे. प्रशासनाचे सुद्धा या दरांवर नियंत्रण नाही त्यामुळे मागेल त्या दरामध्ये शेतकऱ्यांना केळीची विक्री करावी लागत आहे तर अनेक शेतकऱ्यांनी बागेवर कुऱ्हाड चालवणे पसंद केले आहे.
शेतकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी...
अवकाळी पावसामुळे आधीच फळबाग तसेच रब्बी आणि खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. खानदेश तसेच मराठवाडा भागात फळबागांचे क्षेत्र वाढत आहे मात्र सतत नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे मन खचत चालले आहे आणि यामध्ये दर घसरत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत चालले आहे.
Share your comments