गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. आता गेल्यावर्षीच्या उसाच्या प्रतिटन ४०० रुपयांसाठी आजपासून साखरेचे एक पोते देखील कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही. त्याचबरोबर एखादा ट्रक, टेम्पो जर कार्यकर्त्यांनी अडवला तर याला संघटना जबाबदार राहणार नाही, असे ते म्हणाले.
शेट्टी म्हणाले की, गेल्या गळीत हंगामातील प्रति टन ४०० रुपये मिळावेत आणि त्याचबरोबर यंदाच्या गळीत हंगामातील दिशा ठरण्यासाठी मंगळवारपासून (ता. १७) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ‘आत्मक्लेश यात्रा’ काढली जाणार आहे.
२२ दिवस ही यात्रा काढली जाणार आहे. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर अशी ही यात्रा असणार आहे. यावेळी जयसिंगपूर या ठिकाणी या दिवशी २२ वी ऊस परिषद घेतली जाणार आहे. साखर कारखान्यांना चारशे रुपये देणे शक्य आहे. त्यामुळे स्वाभिमानीची मागणी चुकीची नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जनाची नाही तर मनाची लाज वाटून कारखानदार ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देतील. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर ढोल बजावून त्यांना जाग करण्याचे काम केले आहे. उद्यापासून उग्र आंदोलन केले जाणार आहे.
कारखाने सुरू झाल्यानंतर प्रतिक्विंटल दर ३३०० रुपये होता. सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा कारखान्यांना ५०० रुपये दर मिळाले आहेत. ते शेतकऱ्यांना दिले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्याचा नाद खुळा! चक्क ऑडीतून केली भाजीची विक्री, पब्लिक बघतच राहिले...
Share your comments