डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना महागाईची मोठी चपराक बसली आहे. आजपासून तुम्हाला अनेक सेवांसाठी जास्त पैसे मोजावे लागतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपासून जिओ रिचार्ज 21 टक्क्यांनी माग झाले आहेत.कोणकोणत्या सेवा महाग झाल्या या लेखाच्या माध्यमातून पाहू.
जिओ रिचार्ज प्लान महागले
जिओने आजपासुन आपले रिचार्ज प्लान महागकेले आहेत. जर तुम्हाला जिओचा 75 रुपयाचा रिचार्ज घ्यायचा असेल तर आजपासून त्यासाठी 91 रुपये द्यावे लागतील. जिओनी रिचार्ज प्लान जवळपास 21 टक्के महाग केले आहेत. 129 रुपयांचा प्लॅन हा आता 155 रुपयांना मिळेल. 399 रुपयाच्या प्लॅनची किंमत 479 रुपयांची, 1299 रुपयांचा प्लान 1559 आणि 2399 रुपयांच्या क्लबसाठी आता 2879 रुपयांची किंमत असेल. तसेच डेटा टॉप अपच्या किमती देखील वाढवण्यात आले आहेत.आत्ता सहा जीबी डेटा साठी 51 ऐवजी 61 रुपये, बारा जीबी साठी 101 ऐवजी 121 रुपये हे पन्नासजीबी साठी 251 ऐवजी 301 रुपये मोजावे लागतील.
एसबीआय क्रेडीट कार्ड वापरकर्त्यांना 99 रुपये शुल्क भरावे लागेल
जर तुमच्याकडे एसबीआयची क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला आज पासून त्या कार्डद्वारे खरेदी करणे थोडे महाग पडेल. 99 रुपये आणि प्रत्येक खरेदीवर स्वतंत्रपणे कर भरावा लागेल. हे प्रोसेसिंग चार्ज असेल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्यामते,1 डिसेंबर 2021 पासून सर्व व्यापारीEMI व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क आणि कर म्हणून 99 रुपये भरावे लागते.
डीटीएच रिचार्ज साठी जास्त पैसे द्यावे लागतील
आजपासून तुम्हाला स्टार प्लस,कलर्स, सोनी आणि झी सारखे चॅनेल साठी 35 ते 50 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. सोनी चैनल पाहण्यासाठी 39 रुपये ऐवजी 71 रुपये प्रति महिना मोजावे लागतील .
त्याचप्रमाणे झी चॅनेल साठी 39 रुपयांऐवजी 49 रुपये प्रति महिना तसेच विअकॉम18 चॅनेल साठी 25 ऐवजी 39 रुपये
माचिसची किंमत दुप्पट
मातीची किंमत 14 वर्षांत दुप्पट झाली आहे. 1 डिसेंबर 2021 पासून तुम्हाला माचिस बॉक्स साठी एक रुपये ऐवजी दोन रुपये खर्च करावे लागतील. शेवटच्या वेळी 2007 मध्येच माचिस बॉक्सी किंमत पन्नास पैशांवरून एक रुपये करण्यात आली होती. माचिस बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ हे भाव वाढण्याचे कारण आहे.
Share your comments